

नागपूर : विदर्भातील ६२ विधानसभा मतदारसंघात नेत्यांनी बंडखोरी केल्याने अधिकृत राजकीय पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. या बंडोबांना थंड करण्यासाठी ४ नोव्हेंबरपर्यंत मनधरणी करावी लागणार आहे. हे राजकीय पक्षापुढे मोठे आव्हान असून बंडखोरांना अर्ज मागे घेण्यासाठी मोठी कसरत आहे. अर्ज छाननीच्या दिवशी बहुतांश बंडखोरांचे अर्ज कायम राहीले.