
Maharashtra Vidhansabha Election Result 2024: भाजपचे कर्जत-जामखेडचे उमेदवार माजी मंत्री राम शिंदे यांनी पराभवानंतर अजित पवारांवर थेट आरोप केले आहेत. राम शिंदे म्हणाले की, कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो आहे. हे आज दिसून आलं आहे. राजकीय सारीपाटात मी बळी ठरलो आहे. यासंदर्भात मी अगोदरच सांगितलं आहे. मी महायुतीचा धर्म पाळण्यासाठी अजित पवारांकडे मागणी करत होतो. पण त्यांच्या आजच्या वक्तव्याने तो एक सुनियोजित कट होता हे समजलं, असं राम शिंदे म्हणाले.