
महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाबाबत सतत सस्पेंस आहे. विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळून ७ दिवस उलटले तरी महायुतीमध्ये सरकार स्थापनेबाबत काहीही स्पष्ट झालेले नाही. दिल्लीत झालेल्या बैठकीतूनही कोणताही निष्कर्ष निघू शकला नाही. त्याचवेळी महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल अचानक त्यांच्या मूळ गावी गेल्याने राजकीय खळबळ माजली आहे. यावर आता भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी भाष्य केले आहे. सत्तास्थापनेला वेळ लागण्यामागचं कारण त्यांनी सांगितलं आहे.