Sambhaji Raje Chhatrapati esakal
Maharashtra Election 2024 Result
Sambhaji Raje Chhatrapati: छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु केवळ जिजामाता, संभाजीराजे छत्रपतींचे अमित शहांना उत्तर!
Sambhaji Raje Chhatrapati Response to Amit Shah Statement on Shivaji Maharaj: अमित शहा यांच्या या विधानामुळे विधानसभा निवडणुकीतील वातावरण अधिक तापल्याचे दिसून येते. राज्यातील मतदारांमध्ये या वादामुळे काय परिणाम होतील, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. दिल्लीतील भाजपचे दिग्गज नेते महाराष्ट्रात प्रचाराच्या निमित्ताने भेट देत असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सत्यजित देशमुख आणि निशिकांत पाटील यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आले. त्यांनी सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथे एक सभा घेतली. या सभेत त्यांनी समर्थ रामदासांचे उल्लेख करत केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.