विसापूरसह २१ गावांनी सुहास बाबर यांना चांगलीच मदत केली. आबा आणि अनिल बाबर यांच्या मैत्रीचा कित्ता सुहास बाबर आणि रोहित पाटील यांनी गिरविला.
विसापूर : माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील (R. R. Patil), अनिल बाबर (Anil Babar) यांची मैत्री अख्ख्या महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. या मैत्रीचा कित्ता त्यांच्या दोन्ही आमदार मुलांनी गिरवला आहे. पक्ष कोणताही असो, आपली मैत्री घट्ट राहणार, असा संदेश दोघांनी एकमेकांना दिला आहे. तरुण उमेदवार आमदार सुहास बाबर यांना विसापूर मंडलमधील रोहित पाटील गटाची रसद मिळाल्यामुळे या दोघांच्या मैत्रीचा धागा आणखी मजबूत झाला आहे.