
लाडक्या बहिणींनी सत्तेच्या चाव्या कुणाकडे द्यायच्या, याचा फैसला केल्यानंतर अनेक दिग्गजांच्या दांड्या उडाल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये मातब्बरांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ झाला.
त्यातून सांगली जिल्ह्याचे पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सत्यजित पाटणकर, भगीरथ भालके हे जावई सुटले नाहीत. महायुतीच्या ‘त्सुनामी’चा फटका बसला असला तरी जिल्ह्यातील सहा जावई यावेळी विधानसभेत दिसणार आहेत.