
सांगोला : तालुक्यात महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शेतकरी कामगार पक्ष व महायुतीने शिवसेना पक्षाचे उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीतील दोन उमेदवारीमुळे बिघाडीची चिन्हे निर्माण झाली आहेत. शेकापच्या देशमुखांसह दोन्ही शिवसेनेच्या तालुक्यातील दोन प्रमुख पाटलांनी शड्डू ठोकल्यामुळे तालुक्यातील राजकारणात यंदा तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.