विरोधकांना गावात कसलाही थारा न देता एकही मत दिले नाही. हे गाव पूर्णपणे ताकदीने पाटलांच्या पाठीशी राहिले.
भोसे : महाबळेश्वर तालुक्याचे भूमिपुत्र, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी त्यांच्या दरे तांब ग्रामस्थांनी ग्रामदैवत जननी पद्मावती देवीला अभिषेक केला. एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला; परंतु आमच्या गावचा राजा पुन्हा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बसावा, यासाठी ग्रामस्थ, महिला एकवटल्या आहेत. त्यांनी आपल्या ग्रामदैवताच्या मंदिरात एकत्र येत जननीमातेला साकडे घातले आणि देवीला अभिषेक केला.