-बाजीराव घोडे पाटील
Shirala Assembly Election 2024 Results : गेल्या दोन महिन्यापासून शिराळा विधानसभा मतदार संघात ज्या गोष्टीची सर्व मतदारराजा वाट पाहता होता, तो ऐतिहासिक क्षणाचा दिवस आज उगवला. तालुक्यात कमळ फुलणार की तुतारी वाजणार? या गोष्टीला पूर्णविराम मिळाला आहे.
भाजपा महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख यांनी २२६२४ एवढे विक्रमी मताधिक्य घेऊन विजय संपादन केला आहे. महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांचा दारुण पराभव करत, विधानसभेत जोरदार एंट्री केली आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांना पराभवास सामोरे जावे लागले आहे.
शिराळा विधानसभा क्षेत्रात शिराळा तालुक्यासोबत वाळवा तालुक्यातील ४८ गावांचा समावेश आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ने मानसिंगराव नाईक यांना महाविकास आघाडीकडून तर, भाजपाच्या सत्यजीत देशमुख यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली होती. दोन्ही उमेदवार शिराळा भागातील होते.