सम्राट, राहुल महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी ४८ गावांतील राष्ट्रवादीच्या नेत्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याची जोरदार चर्चा मतदारसंघात आहे.
नेर्ले : शिराळा विधानसभा (Shirala Assembly Results) क्षेत्रातील ४८ गावांत सत्यजित देशमुख निवडून आल्यानंतर गुलालाची उधळण करीत भाजप (BJP) व मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. हा जल्लोष स्वाभाविकच होता. कारण सम्राट आणि राहुल महाडिक यांचे पारंपरिक विरोधक आमदार जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीचा व त्यांच्या नेत्यांचा ४८ गावांतील सामान्य कार्यकर्त्यांनी ‘करेक्ट कार्यक्रम’ करून दाखवला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.