
Latest Mumbai News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात मुख्य लढत होईल हेच पाहायला मिळत आहे.
महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्ष हे तीन पक्ष आहेत. महायुतीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि भारतीय जनता पक्ष हे तीन पक्ष आहेत. अशावेळी या दोन आघाड्यांमध्ये प्रामुख्याने काटे की टक्कर होणार यात काहीच वाद नाही.