South Maharashtra Election : दक्षिण महाराष्ट्रत महायुतीचा डंका,‘मविआ’चा विचका

South Maharashtra Mahayuti Victory : दक्षिण महाराष्ट्रात महायुतीने २६ पैकी २३ जागांवर विजय मिळवला. कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील महिलांचे वाढलेले मतदान आणि हिंदुत्वाच्या प्रभावामुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला.
South Maharashtra Election
South Maharashtra Electionsakal
Updated on: 

South Maharashtra Mahayuti Victory : दक्षिण महाराष्ट्रात २६ पैकी २३ जागांवर विजय मिळवत महायुतीने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला असून सांगली जिल्ह्यात ८ पैकी ३ जागांवर विजय मिळवण्यात यश मिळविले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या या निवडणुकीत दक्षिण महाराष्ट्रात महाविकास आघाडी आपला गड कायम राखेल, ही शक्यता वर्तविण्यात येत असतानाच महायुतीच्या परफेक्ट प्लॅनिंगमुळे ‘महाविकास’चा करेक्ट कार्यक्रम करत त्यांचा गड उद्‌ध्वस्त केला.

Loading content, please wait...