
Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरे यवतमाळमधील वणी येथे प्रचारसभेत आले असता हेलिपॅडवर त्यांची बॅग तपासण्यात आली यावर त्यांचा भडका उडाला, जशी माझी बॅग तपासली तशी मोदी शहा, तर एकनाथ शिंदेचा उल्लेख दाढीवाला आणि अजित पवारांचा उल्लेख जॅकेटवाला आणि फडणवीसांचा उल्लेख टरबुज असा करत त्यांच्याही बॅग तपासायला हवी का नको सवाल त्यांनी सभेत केला.
त्यांच्या बॅगा जर निवडणूक अधिकारी तपासणार नसतील मविआचे कार्यकर्ते तपासतील, तिथे पोलिस आणि निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी पुढे यायचे नाही. असा इशाराही त्यांनी दिला.