छत्रपती संभाजीनगर/नागपूर/ सातारा - नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आक्षेप घेत पराभूत उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या होत्या. ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या व बोगस मतदानाच्या आरोपामुळे राजकीय वातावरणही चांगलेच तापले. मात्र, आयोगाने आक्षेप फेटाळल्याने या उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केल्या आहेत. यात मविआबरोबरच महायुतीच्या पराभूत उमेदवारांचाही समावेश आहे.