
वडाळा विधानसभा जागा ही मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली एक महत्त्वाची जागा आहे. हा मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. यावर्षी इथे उद्धव ठाकरे गटाकडून श्रद्धा जाधव आणि भाजपकडून कालिदास कोळंबकर हे आमनेसामने होते. या निवडणुकीत कालिदास कोळंबकर विजय मिळवला आहे. त्यांनी श्रद्धा जाधव यांना पराभूत केले आहे. कालिदास कोळंबकर 24973 मतांनी विजयी झाले आहेत.