

State Election Commission
esakal
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने बारामती, फलटण आणि महाबळेश्वर या तीन नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घळ घेतला आहे. आयोगाने यासंदर्भात अधिकृत परिपत्रकही प्रसिद्ध केले आहे. बारामती नगरपरिषदेतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह एकूण सात प्रभागांतील उमेदवारांच्या विरोधात जिल्हा न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. या याचिकांवरील निकाल अद्याप प्रलंबित असल्याने नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचा आधार घेऊन संपूर्ण निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.