

zp elections 2026
esakal
Panchayat Samiti Elections: बहुप्रतिक्षित जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांची घोषणा केली. महानगर पालिकांपेक्षाही जिल्हा परिषद निवडणुकांचा राजकीय धुरळा जास्त उडत असतो. त्यामुळे या मिनी मंत्रालयासाठी राजकीय पक्ष काय-काय आखणी करतात, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.