MP Elections 2023 : मध्य प्रदेशात अपक्ष ठरणार 'किंगमेकर्स'? निकालापूर्वी काँग्रेस-भाजपच्या गोटात हालचालींना वेग

उद्या मध्य प्रदेश विधानसभा निवडूकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
mp election
mp election

मध्य प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीचा निकाल अगदी काही तासांवर येऊन ठेपला आहे. राज्यातील एक्झिट पोलच्या निकालानुसार , भाजप आणि काँग्रेस यांच्याच बरोबरीची लढत होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत अपक्ष उमेदवारांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. यामुळे काँग्रेस आणि भाजम यांच्यात अपक्ष उमेदवारांना आपल्या गटात खेचण्यासाठी चढाओढ लागली आहे. दोन्ही पक्ष आपल्या खास लोकांकडे याची जबाबदारी दिल्याचे समजते.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूकीच्या एक्झिट पोलनुसार २ ते आठ जागा या इतर (दूसरे पक्ष किंवा अपक्ष) यांना मिळू शकतात. यापैकी बरेच जण हे काँग्रेस आणि भाजपकडून तिकीट न मिळालेले बंडखोर असल्याची शक्यता आहे. ज्यांनी तिकीट न मिळाल्याने बसपा, सपा, आप किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे.

मतगणनेच्या आधी राजकीप पक्षांकडून कास रणनिती तयार केली जात आहे. निकालानंतर लढत अटीतटीची झाल्यास बहुमताचा आकडा वाढवण्यासाठी अपक्ष आमदारांना आपल्यात सामील करून घेण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसच्या सर्व आमदारांना काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटक येथील बेंगळुरू येथे शिफ्ट केलं जाऊ शकतं.

भाजपकडून देखील मोठी तयारी केली जात आहे. पक्षाशी संबंधीत बंडखोर अपक्ष आमदारांची समजूत काढण्याचे प्रयत्न आत्तापासूनच सुरू करण्यात आले आहेत. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून आमदारांचा घोडेबाजार रोखण्यासाठी वेगवेगळे प्लॅन आखले जात आहेत.

२०१८ च्या निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर केवळ चार अपक्षांनी निवडणूक जिंकली. यापैकी प्रदीप जैस्वाल आणि विक्रमसिंह राणा यावेळी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. तर सुरेंद्र सिंह शेरा आणि केदार डाबर हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. याआधी २०१३ मध्ये दिनेश राय मुनमुन, सुदेश राय आणि कलसिंग भाबर यांनी अपक्ष निवडणूक जिंकली होती तर २०१८ मध्ये चार अपक्ष उमेदवारही दुसऱ्या क्रमांकावर होते. तसेच तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अपक्षांची संख्या ३५ होती.

अपक्ष काँग्रेस-भाजपसाठी अडचण

राज्यात अशा डझनभर जागा आहेत, जिथे अपक्ष हे भाजप आणि काँग्रेससाठी मोठे आव्हान ठरले असल्याचे मानले जाते. अंतर सिंग दरबार हे डॉ. आंबेडकर नगर (महू) विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. ते काँग्रेसमधून आमदार राहिले आहेत, मात्र तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

त्याचप्रमाणे अलोटमधून प्रेमचंद गुड्डू, गोटेगावमधून शेखर चौधरी, सिओनी माळव्यातून ओम रघुवंशी, होशंगाबादमधून भगवती चौरे, धारमधून कुलदीपसिंग बुंदेला, मल्हारगडमधून श्यामलाल जोकचंद, बडनगरमधून राजेंद्रसिंग सोलंकी, गोटेगाव येथीन शेखर चौधरी, सिवनी मालवा येथून ओम रघुवंशी, होशंगाबाद येथूल भागवती चौरे, धार येथून कुलदीप सिंह बुंदेला, मल्हारगड येथून श्यामलाल जोकचंद, बडनगर येथून राजेंद्र सोळंकी, भोपाळ उत्तरमधून नासीर इस्लाम आणि आमिर अकील अपक्ष म्हणून निवडणीक लढवत आहेत.

काँग्रेसच्या तुलनेत भाजपमध्ये बंडखोर कमी आहेत. सिधी येथील केदारनाथ शुक्ला आणि बुरहानपूरमधील हर्षवर्धन सिंह चौहान हीच मोठी नावे आहेत जी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.

उद्या होणार मतमोजणी

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवार, ३ डिसेंबर रोजी होणार आहे. राज्यात नव्या सरकारसाठी मुख्य लढत सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेसमध्ये आहे. मात्र, दोन्ही पक्ष आपापल्या उमेदवारांना चांगल्या फरकाने सरकार स्थापन करणार असल्याची ग्वाही देत ​​आहेत. १३० ते १३५ जागांवर निकाल त्यांच्या बाजूने लागणार असा विश्वास दोन्ही पक्षांनी त्यांच्या उमेदवारांना दिला आहे. मात्र, वेगवेगळ्या एक्झिट पोलच्या निकालानंतर ही लढत अगदी कमी फरकाने लागल्यास घोडेबाजार होण्याची शक्यता आहे, निवडणुकीनंतर आमदारांची खरेदी विक्री टाळण्यासाठी दोन्ही पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com