

Salim Sarang
ESakal
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी होणार आहेत. निवडणुकीपूर्वीच काही ठिकाणी भाजप उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवला आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) निवडणुकीत मतदान सुरू होण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाच्या दोन महिला उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवला. यातच आता महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.