हरीश रावत म्हणतात, ‘भाजप जिंदाबाद’ म्हणणारे लोक समजत नाही

Harish Rawat
Harish RawatHarish Rawat

माझ्यासाठी हा निकाल अतिशय आश्चर्यकारक आहेत. मला समजत नाही की एवढ्या प्रचंड महागाईनंतर लोककल्याणाची आणि सामाजिक न्यायाची व्याख्या काय असेल? ‘भाजप जिंदाबाद’ म्हणणारे लोक मला समजत नाहीत. आमची प्रचाराची रणनीती अपुरी होती आणि ती मी प्रचार समितीचा अध्यक्ष म्हणून स्वीकारतो, असे पराभवानंतर हरीश रावत (Harish Rawat) म्हणाले.

उत्तराखंडचे (Uttarakhand) माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते हरीश रावत (Harish Rawat) यांना २०१७ नंतर २०२२ मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. लालकुवा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मोहन सिंग बिश्त यांनी त्यांचा १४ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. रामनगर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने हरीश रावत यांना हटवून लालकुआ जागेवर उभे केले होते. यानंतर लालकुआ हा चर्चेचा विषय बनला होता.

Harish Rawat
भाजपच्या विजयानंतर मुलायम यांच्या धाकट्या सूनेचे दोन ओळीत ट्विट

उत्तराखंडमधील (Uttarakhand) लोकांची मने जिंकण्यासाठी आमचे प्रयत्न कमी पडले. आमची खात्री होती की लोक बदलाला मतदान करतील. आमच्या प्रयत्नांमध्ये नक्कीच कमतरता राहिली. मी ते स्वीकारतो आणि पराभवाची जबाबदारी स्वीकारतो. मुलांनी खूप चांगले काम केले आणि मला त्यांचे आभार मानायचे आहेत. मी लोकांचा विश्वास जिंकू शकलो नाही. परंतु, मला माझ्या मुलीचे आणि सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करायचे आहे, असेही हरीश रावत (Harish Rawat) म्हणाले.

जनतेने दाखवला नाही विश्वास

हरीश रावत (Harish Rawat) यांनी मुख्यमंत्री असताना २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत दोन जागांवरून (हरिद्वार ग्रामीण आणि किच्छा) विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, दोन्ही जागांवर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी त्यांनी नैनिताल जिल्ह्यातील हल्द्वानीजवळील लालकुआ विधानसभेतून निवडणूक लढवली होती. यावेळीही राज्यातील जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com