Pune Corporation Election: हरकतींचा पाऊस पण सुनावणीला निरुत्साह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corporation Election

Pune Corporation Election: हरकतींचा पाऊस पण सुनावणीला निरुत्साह

पुणे : पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेवर पुणेकरांनी नाराजी व्यक्त करत तब्बल साडे तीन हजारापेक्षा जास्त हरकती सूचना नोंदविल्या. मात्र, प्रत्यक्ष सुनावणीच्या वेळी दोन्ही दिवस मिळून फक्त ७७३ जणच उपस्थित राहिले असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आता महापालिकेकडून त्याचा प्रारूप आराखड्यात बदल करण्यासाठी आयोगाकडे शिफारशी पाठवल्या जातील. त्यानंतर अंतीम प्रभागरचना जाहीर होईल. (Pune Minicipal Corporation ELection Updates)

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तीन सदस्यांचा प्रभाग असणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने १ फेब्रुवारी रोजी प्रारूप आराखडा जाहीरकरून त्यावर हरकती सूचना मागविल्या होत्या. या प्रभागरचनेत प्रस्थापितांचे प्रभाग गायब झाल्याने यावर टीका करण्यात आली. त्यावर आक्षेप घेण्यासाठी ३ हजार ५९६ हरकती व सूचना निवडणूक आयोगाकडे नोंदविण्यात आल्या होत्या.

हेही वाचा: ''पप्पा मला घरी यायचंय''; युक्रेनमधील विद्यार्थांची आर्त हाक

यावर गुरुवारी आणि शुक्रवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे सुनावणी झाली. यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम यांनी ही सुनावणी घेतली. महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, अप्पर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव दीपक नलावडे, अप्पर सचिव अतुल जाधव, महापालिकेच्या निवडणूक शाखेचे उपायुक्त अजित देशमुख उपस्थित होते.

आज दिवसभरात प्रभाग क्रमांक २१ ते २६ आणि ३६ ते ५८ या प्रभागांवरील हरकती सूचनांवर सुनावणी झाली. आज दिवसभरात २ हजार ८१ जण या सुनावणीसाठी अपेक्षीत होते, पण त्यापैकी केवळ ४२० नागरिकच आजच्या सुनावणीला उपस्थित राहिले.

दरम्यान, पहिल्या दिवशी (गुरुवारी) झालेल्या सुनावणीमध्ये १हजार ५१५ पैकी ३५३ जणांनीच हजेरी लावली होती. या दोन्ही दिवसात केवळ ३१ टक्केच हरतकदार उपस्थित राहिल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

Web Title: Pune Corporation Election Updates 2022 Drl98

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..