Uttarakhand Election: माझ्या नावाला आक्षेप नाही - हरिश रावत

पंजाबप्रमाणे दलित व्यक्ती मुख्यमंत्री बनावी, असे रावत यांनी म्हटले आहे.
Harish Rawat
Harish RawatSakal
Updated on

लालकुआँ : उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणूक माझ्याच नेतृत्वाखाली लढविली जात आहे. मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून माझ्या नावाला पक्षातील कुणाचाही आक्षेप नाही, असा दावा माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनी केला. (Uttarakhand Assembly Election Updates)

पंजाबप्रमाणे तुमच्या नावाची अधिकृत घोषणा का झाली नाही, या प्रश्नावर त्यांनी, ही व्यूहात्मक चाल असल्याचे उत्तर दिले. ४० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना यावेळी मी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार असावा असे वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, मी सत्तेचे नव्हे तर संघर्षाचे राजकारण करतो. प्रचार मोहिमेचे नेतृत्व मी करावे असे पक्षाकडूनच मला सांगण्यात आले. आम्ही जिंकण्यासाठी निवडणूक लढवीत आहोत.

पंजाबप्रमाणे दलित व्यक्ती मुख्यमंत्री बनावी, असे रावत यांनी म्हटले आहे. याचा संदर्भ देत तुम्ही निवडणूक का लढवीत आहात, हा विरोधाभास नाही का, या प्रश्नावर ते म्हणाले की, स्वातंत्र्याला ७५ वर्षे उलटल्यानंतर आपण काही मनोवृत्तींमधून बाहेर पडायला आहे. तसा बदल पंजाबमध्ये घडला आहे. उत्तराखंडमध्येही तो व्हावा म्हणून मी प्रार्थना केली आहे. आगामी काळात मुख्यमंत्रिपदासाठी दलित व्यक्तीला घडविता यावे यासाठी मी गंगामैय्याला साकडे घातले आहे, पण तुम्ही अशी इच्छा व्यक्त करता तेव्हा ती पूर्ण होण्यासाठी कोणतीही कालमर्यादा नसते.

वास्तविक रावत यांना आधी रामनगरमधून उमेदवारी देण्यात आली होती, पण कार्याध्यक्ष रणजित रावत यांचा विरोध होता. त्यामुळे रावत हे लालकुवाँ येथून रिंगणात उतरले आहेत.

उमेदवार जाहीर करण्याचे काँग्रेसकडे धैर्यच नाही : राजनाथ

रामनगर : भाजपचे वरिष्ठ नेते, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले की, उत्तराखंडसाठी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याचे धैर्य काँग्रेसकडे नाही. राज्यातील जनतेला अंधारात ठेवून काँग्रेस ही निवडणूक लढवीत आहे. असे कोणत्याही पक्षाने करता कामा नये. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीत भाजप सरकारने उत्तराखंडला विशेष दर्जा दिला. काँग्रेसने सत्तेवर आल्यानंतर तो काढून घेतला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर हा दर्जा पुर्ववत करण्यात आला, असेही त्यांनी नमूद केले. काँग्रेसला याबद्दल जाब विचारण्यात यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

सत्ता राखल्यास समान नागरी कायद्यांची अंमलबजावणी करण्याची पुष्करसिंह धामी घोषणा ही निव्वळ चाल आहे. हा विषय त्यांच्या घटनात्मक अधिकारात येतच नाही.

- हरिश रावत, काँग्रेसचे नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com