Telangana Election Result : इथूनच झालेली पराभवाची सुरवात.. तेलंगणाची निर्मिती करणाऱ्या 'सोनियाम्मा' साठी हा विजय का आहे खास?

तेलंगणाच्या निर्मितीत महत्वाचा वाटा असणाऱ्या काँग्रेसला सुरुवातीलाच दोन टर्म सत्तेपासून दूर राहावे लागले होते.
Telangana Assembly election
Telangana Assembly electionesakal

पुणे - आंध्रप्रदेशमधून एकेकाळी निवडणूक लढवलेल्या इंदिराम्मा, स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीला पाठबळ देणाऱ्या सोनियाम्मा आणि आता त्यांच्याच रूपाने केसीआर सरकारला टक्कर देणाऱ्या प्रियांकाम्मा यांचा तेलंगणाच्या विजयात मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे.

तेलंगणाच्या निर्मितीत महत्वाचा वाटा असणाऱ्या काँग्रेसला सुरुवातीलाच दोन टर्म सत्तेपासून दूर राहावे लागले होते.

सत्तेत आल्यानंतर केसीआर सरकार काँग्रेसला मदत करेल अशी आशा होती मात्र केसीआर सरकारने भाजपशी छुपी युती करत असल्याचा आरोप करत काँग्रेसने लोकांचा विश्वास परत मिळविण्यात यश मिळवले.

स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीसाठी मनमोहन सरकरने केली होती मदत

स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीचा प्रवास हा गेल्या अनेक दशकांचा आहे. या प्रवासाची सुरुवात ही मुल्की चळवळीतून झालेली आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षापेक्षा विचारधारा, चळवळ हे मुद्दे तेलंगणाच्या निर्मितीपूर्वी महत्वाचे होते.

केसीआर यांनी २००१ मध्ये स्वतंत्र तेलंगणाची मागणी करत तेलंगण राष्ट्र समिती या पक्षाची स्थापना केली. पक्षाची स्थापना झाल्यानंतर केसीआर अधिकच आक्रमक झाले.

मात्र आंध्रप्रदेशच्या विभाजनाला तेलगू देशम पक्षाने विरोध केला होता. हा विरोध झुगारून २०१३ या वर्षात मनमोहन सिंग सरकारने तेलंगणा राज्य करण्यावर शिक्कामोर्तब केले आणि २०१४ या वर्षात स्वतंत्र तेलंगणा राज्याची निर्मिती झाली.

२०१४ मध्ये काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागलेला

तेलंगणाच्या स्वतंत्र राज्याच्या निर्मितीला पाठबळ दिल्याने २०१४ सालच्या या राज्याच्या स्थापनेनंतरच्या पहिल्याच निवडणुकीतून काँग्रेसला सत्ता मिळण्याची मोठी अशा होती. मात्र स्थानिक अस्मितेचा मुद्दा मोठा झाला आणि केसीआर सरकार स्थापन झाले.

या निवडणुकीत केसीआर सरकारला ६३ जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला २१ जागा मिळाल्या होत्या. यामुळे काँग्रेसला पहिल्याच निवडणुकीत मोठा पराभव येथे स्वीकारावा लागला होता.

केसीआर आणि काँग्रेस एकत्र येतील अशी आशा होती पण..

आंध्रप्रदेशच्या २९४ जागांचे विभाजन होऊन आंध्रप्रदेशच्या वाट्याला विधानसभेच्या १७५ जागा आल्या तर तेलंगणाच्या वाट्याला ११९ जागा आल्या.

काँग्रेसला अशी आशा होती की राज्याच्या निर्मितीमध्ये मदत केल्याने केसीआर यांनी पुढील काळात काँग्रेस आणि तेलगू राष्ट्र समिती भविष्यात एकत्र येऊ शकतात असे संकेत दिले होते.

परंतु केसीआर सरकारने सलग दोन विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्याने त्यांना आपल्याला आता काँग्रेसला सोबत घेण्याची आवश्यता नाही असे वाटू लागले.

Telangana Assembly election
Telangana Election : आज मी तुमच्यासमोर हात जोडते.. सोनिया गांधी यांनी केले भावनिक आवाहन

आंध्र आणि तेलंगणा मुद्यावरून काँग्रेसची वाताहत का झालेली?

२००९ च्या लोकसभेमध्ये काँग्रेसने मिळवलेल्या विजयामध्ये सिंहाचा वाटा आंध्रप्रदेशचा होता. मात्र काँग्रेसने तेलंगणा राज्याच्या निर्मितीला पाठिंबा दिल्याने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आंध्रमध्ये काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले होते.

काँग्रेसला ज्या तेलंगणामधून जिकंण्याची आशा होती त्या तेलंगणामध्येही केसीआर यांच्या खेळीने काँग्रेसची चांगलीच वाताहत झाली. यामुळे सलग दोन विधानसभा ठरणाऱ्या काँग्रेससाठी तेलंगणाच्या जनतेने त्यांच्यावर पुन्हा ठेवलेला विश्वास अतिशय महत्वाचा आहे.

इंदिराम्मा, सोनियाम्मा आणि आता प्रियांकाम्मा यांची छाप !

तेलंगणा आंध्र प्रदेशचा भाग असल्यापासून काँग्रेसच्या इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांच्या कामाचा तेलंगणावर प्रभाव राहिलेला होता. काँग्रेसच्या प्रियांका गांधी ज्यावेळी प्रचारासाठी गावोगावी फिरत होत्या त्यावेळी अनेकांनी त्यांना 'इंदिरा अम्मा' अशी हाक मारली.

इंदिरा गांधी ज्यावेळी आणीबाणीनंतर रायबरेलीमधून निवडणूक हारल्या होत्या त्यानंतर १९८० मध्ये त्यांनी मेडकसह अन्य दोन जागांवरून लोकसभेची निवडणूक लढली होती. ते मेडक सध्या तेलंगणा येथे आहे.

त्यावेळी त्या २ लाख ९५ हजाराच्या फरकाने निवडून आल्या होत्या. तेथील आदिवासी नागरिक सांगतात की, इंदिरा अम्माने आम्हाला आमच्या जमिनी परत मिळवून दिल्या होत्या.तसेच सोनिया गांधी त्यांनी स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीसाठी केलेले योगदानही लोक विसरले होते.

अजूनही तेथील ज्येष्ठ नागरिक काँग्रेसच्या विचारांनी प्रभावित असल्याने या विधानसभेत इंदिराम्मा, सोनियाम्मा आणि आता प्रियांकाम्मा यांची छाप दिसून आली.

Telangana Assembly election
Telangana Election Result : पंतप्रधान होण्याचं स्वप्न बघितलं अन् मुख्यमंत्रीपद ही गमावलं! केसीआर यांची शोकांतिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com