
Telangana Assembly Election 2023 : तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार यावेळी शिगेला पोहोचला. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात के. चंद्रशेखर राव यांची हॅटट्रीक रोखण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने मोठी ताकद लावली आहे. काँग्रेसने कर्नाटकातल्या २५ टक्के मंत्र्यांना तेलंगणामध्ये प्रचाराला पिटाळलं.
भाजपकडून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी लागोपाठ सभा आयोजित केल्या होत्या. सहा महिन्यांपासून भाजपने अग्रेसिव्ह कॅम्पेनिंग केलं आणि बीआरएसवर हल्ला चढवला. परंतु जसजसं मतदानाची तारीख जवळ येत होती तसं काँग्रेसने प्रचारात बाजी मारल्याचं बघायला मिळालं. परंतु शेवटच्या टप्प्याने भाजपने जोर लावला आणि लढत तिरंगा करुन टाकली.
केसीआर यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसचं नेतृत्व रेवंत रेड्डी करत आहेत. तर भाजपकडून सेनापतीच्या भूमिकेत के. लक्ष्मण हे आहेत. काँग्रेस किवा भाजपला तेलंगणामध्ये बहुमत मिळत असेल तर मुख्यमंत्री कोण होईल? असा प्रश्न उपस्थित होतोय.
विरोधकांकडे केसीआर यांच्या ताकदीचा नेताच नाही
भाजप आणि काँग्रेस भलेही ताकदीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरले असतील. परंतु या दोन्ही पक्षांकडे केसीआर यांच्याएवढा मोठा नेता नाहीये. तेलंगणामध्ये के. चंद्रशेखर राव यांची राजकीय ताकद मोठी आहे. स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी केसीआर यांनी दीड दशक लढाई लढली आहे. २००९ मध्ये त्यांनी केलेलं आमरण उपोषण आजही लोकांच्या लक्षात आहे. त्यामुळे त्यांना लोक तेलंगणाचे मसिहा मानतात.
काँग्रेसमध्ये पाच दावेदार
काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष ए. रेवंत रेड्डी हेच फ्रंटफूटवर दिसून येत आहेत. असं असलं तरी पक्षात मुख्यमंत्रीपदाचे अनेक दावेदार आहेत. माजी मंत्री के. जना रेड्डी, मल्लू भट्टी विक्रमार्क, माजी प्रदेशाध्यक्ष कॅप्टन एन. उत्तमकुमार रेड्डी, खासदार कोमाटिरेड्डी व्यंकट रेड्डी आणि माजी उपमुख्यमंत्री दामोदर राजनरसिन्हा हेसुद्धा रेसमध्ये आहेत. त्यामुळे पक्षाने नेतृत्वाचा निर्णय निवडणुकीनंतर घेणार असल्याचं स्पष्ट केलंय.
भाजपकडून मागासवर्गीयाला मुख्यमंत्री करण्याची घोषणा, चार जण रेसमध्ये
केसीआर यांना टक्कर देण्यासाठी भाजपने युवा नेतृत्वाला संधी देण्याचा विचार केला आहे. सत्ता आल्यास ओबीसी नेत्याला मुख्यमंत्री करण्याचा शब्द भाजपने जनतेला दिलेला आहे. त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय महासचिव बंदी संजय, प्रदेशाध्यक्ष जी. किशन रेड्डी, भाजप ओबीसी मोर्चाचे नेते के. लक्ष्मण आणि हुजूराबाद मतदारसंघाचे आमदार इटाला राजेंद्र हे नेते रेसमध्ये आहेत. इटाला राजेंद्र हे गजवेलमध्ये केसीआर यांना टक्कर देत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.