उत्तराखंडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत; कोण होणार मुख्यमंत्री?

उत्तराखंड निवडणुकांचे सर्व अपडेट्स...
उत्तराखंडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत; कोण होणार मुख्यमंत्री?

Uttarakhand Assembly Election Result : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी १४ फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं. एका टप्प्यात झालेल्या मतदानात ७० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. याआधी २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने ५७ जागांसह बहुमत मिळवले होते. त्यानतंर राज्यात भाजपचे सरकार (BJP) स्थापन झाले होते. यावेळी भाजपने त्यांना ६० पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तर, काँग्रेसने २०२२ मध्ये राज्यात पुन्हा सत्ता मिळेल असं म्हटलं आहे. त्यांनी दावा केला आहे की, २०२२ मध्ये राज्यात काँग्रेसचं (Congress) सरकार स्थापन होईल.

माजी मुख्यमंत्री हरीष रावत हे लालकुआँ मतदारसंघातून मैदानात उतरले आहेत. यावेळी उत्तराखंडमध्ये आम आदमी पार्टीसुद्धा (AAP) निवडणूक लढत आहे. त्यांनी कर्नल अजय कोठियाल यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केलं आहे. भाजपने निवडणुकीच्या आधी पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची सुत्रे दिली होती. तर २०१७ मध्ये एकहाती निवडणूक जिंकल्यानंतर त्रिवेंद्र सिंह रावत यांना मुख्यमंत्री केलं होतं.

उत्तराखंडचे विद्यमान मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी देहरादून येथील पक्ष मुख्यालयात दाखल.

उत्तराखंडमध्ये भाजपा बहुमताच्या पलीकडे जाताना दिसत असतात, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी खतिमा मतदारसंघातून निवडणूक हरले आहेत.

उत्तराखंडमध्ये 70 जागांवर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सुरू असून, सध्या भाजप ४८ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस १८ जागांवर आघाडीवर आहे.

उत्तराखंड: भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक यांनी हरिद्वार शहर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सतपाल ब्रह्मचारी यांचा जवळपास 14,000 मतांनी पराभव केला.

हरीश रावत यांची कन्या अनुपमा रावत हरिद्वार ग्रामीणमधून विजयी

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचा खतिमा विधानसभा मतदारसंघातून 14 हजार मतांनी पराभव झाला आहे. लालकुआँमध्ये भाजपचा विजय

उत्तराखंडमध्ये लालकुआँ मतदारसंघामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत 10,000 मतांनी पिछाडीवर आहेत.

आम्हाला आधीच माहित होते की, आम्ही सरकार स्थापन करू कारण पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडच्या जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही गेल्या 6 महिन्यांत लोकांचे प्रश्न सोडवले आहेत, असे भाजप नेते कैलाश विजयवर्गीय

उत्तराखंडः उत्तराखंडमध्ये भाजप चांगली कामगिरी करत आहे पण राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे खतिमा विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.

उत्तराखंडमधून काँग्रेस नेते हरीश रावत यांची कन्या अनुपमा रावत हरिद्वार ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत.

उत्तराखंडमधील आता समोर आलेला निकाल हा अपेक्षेप्रमाणे असून, उत्तराखंडच्या जनतेला आमचे काम दिसून आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पुष्कर सिंह धामी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र काम केले आहे. मी जनता आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतो, असे केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे भाजपचे प्रभारी प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे.

उत्तराखंडमध्ये भाजपाने बहुमताचा आकडा पार केला असून, यामध्ये भाजप 44 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 22 जागांवर आघाडीवर आहे.

उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पक्षाने सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये बहुमताचा आकडा पार केला आहे.

उत्तराखंडमध्ये भाजप 39, काँग्रेस 25, अपक्ष 06 जागांवर आघाडीवर आहेत.

उत्तराखंड - निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात भारतीय जनता पक्ष 25 जागांवर आघाडीवर आहे. येथे काँग्रेस 17, बसपा 2, इतर 2 जागांवर आघाडीवर आहेत.

उत्तराखंडमध्ये खतिमा आणि लालकुवा मतदारसंघातून भाजपचे पुष्कर सिंह धामी आणि काँग्रेसचे हरीश रावत हे पिछाडीवर

उत्तराखंडमध्ये भाजपा ४१, कॉंग्रेस २२ तर अन्य ५ जागांवर आघाडीवर

उत्तराखंडमध्ये कॉंग्रेसचे हरिश रावत पिछाडीवर तर भाजपाचे मोहन सिंह विष्ट आघाडीवर

उत्तराखंडमध्ये भाजपा ३४, कॉंग्रेस २५ आणि अन्य ५ जागांवर आघाडीवर

उत्तराखंडमध्ये ७० जागांपैकी ५७ जागांचा कल हाती आला असून यात भाजपा ३०, कॉंग्रेस २४ आणि अन्य ३ जागांवर आघाडीवर

उत्तराखंडमध्ये ७० जागांपैकी ५७ जागांचा कल हाती आला असून यात भाजपा ३०, कॉंग्रेस २४ आणि अन्य ३ जागांवर आघाडीवर

पहिल्या तासाभरात उत्तराखंडमध्ये भाजपा २६, कॉंग्रेस २० तर अन्य ७ जागांवर आघाडीवर

उत्तराखंडमध्ये भाजप १२, कॉंग्रेस १३ जागांवर आघाडीवर

भाजपा १५, काँग्रेस ८ जागांवर आघाडीवर

उत्तराखंडमध्ये मतमोजणीला सुरूवात, ७० जागांपैकी १५ जागांवर भाजपा आघाडीवर आणि काँग्रेस आठ जागांवर आघाडीवर

  • पहिला कल भाजपच्या बाजूने

उत्तराखंडमध्ये काँग्रेसचीच सत्ता येईल असा आपल्याला विश्वास असल्याचं माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी म्हटलं आहे. पुढच्या काही तासांतच सगळं चित्र स्पष्ट होईल. आपल्याला जनतेवर विश्वास आहे, जवळपास ४८ जागा काँग्रेसला मिळतील असं रावत यांनी म्हटलं आहे.

Uttarakhand Assembly Election Result : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी १४ फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं. एका टप्प्यात झालेल्या मतदानात ७० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. याआधी २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने ५७ जागांसह बहुमत मिळवले होते. त्यानतंर राज्यात भाजपचे सरकार (BJP) स्थापन झाले होते. यावेळी भाजपने त्यांना ६० पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तर, काँग्रेसने २०२२ मध्ये राज्यात पुन्हा सत्ता मिळेल असं म्हटलं आहे. त्यांनी दावा केला आहे की, २०२२ मध्ये राज्यात काँग्रेसचं (Congress) सरकार स्थापन होईल.

माजी मुख्यमंत्री हरीष रावत हे लालकुआँ मतदारसंघातून मैदानात उतरले आहेत. यावेळी उत्तराखंडमध्ये आम आदमी पार्टीसुद्धा (AAP) निवडणूक लढत आहे. त्यांनी कर्नल अजय कोठियाल यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केलं आहे. भाजपने निवडणुकीच्या आधी पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची सुत्रे दिली होती. तर २०१७ मध्ये एकहाती निवडणूक जिंकल्यानंतर त्रिवेंद्र सिंह रावत यांना मुख्यमंत्री केलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com