

Epstein Files Explained in Marathi
esakal
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात “एपस्टीन फाइल्स” हा विषय त्यांना आणि त्यांच्या सरकारला सतत अडचणीत आणणारा ठरला. या फाइल्सचा संबंध दिवंगत लैंगिक गुन्हेगार आणि श्रीमंत व्यापारी जेफ्री एपस्टीनच्या गुन्ह्यांशी आहे. ट्रम्प यांच्या समर्थकांमध्ये आणि रिपब्लिकन पक्षातही या प्रकरणातील सर्व माहिती उघड करण्याची मागणी वाढत होती. मात्र अनेक आठवडे ट्रम्प यांनी या फाइल्स जाहीर करण्याला विरोध केला. अचानक त्यांनी भूमिका बदलली आणि रिपब्लिकन खासदारांना या फाइल्स जनतेसमोर आणण्याच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले.