

Iran’s Economic War Plan Targets US Giants
esakal
Iran Warns 18 US Tech Firms : इराणने अमेरिकेच्या कंपन्यांवर बॉम्ब हल्ल्याची धमकी दिली आहे, हे फक्त एक साधा हल्ला नाही. हे एक मोठे, विचारपूर्वक केलेले आर्थिक युद्ध आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर, इराण थेट अमेरिकेच्या सैन्याशी किंवा युद्धनौकांशी लढत नाहीये. ते अमेरिकेला ‘गनिमी काव्या’त अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे छोट्या-छोट्या, चपळ हल्ल्यांनी मोठ्या शक्तीला थकवणे. प्रथम सैन्यावर, नंतर तेलाच्या क्षेत्रावर आणि आता थेट अर्थव्यवस्थेवर, शेअर बाजारावर लक्ष. ही इराणची नवी रणनीती आहे.