
Laxman Mane Warning
esakal
मराठा समाजाला ओबीसी (इतर मागासवर्गीय) प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या अलीकडील अध्यादेशाने (२ सप्टेंबर २०२५ रोजी जारी) आरक्षणाच्या मैदानावर नवीन वादळ निर्माण झाले आहे. हैद्राबाद गॅझेटमधील ऐतिहासिक नोंदींवर आधारित 'कुणबी मराठा' उपजातींना ओबीसी यादीत घेण्याच्या या निर्णयाने मराठा समाजाच्या मागणीला आंशिक समाधान मिळाले असले तरी ओबीसी, भटक्या विमुक्त आणि इतर मागासवर्गीय समाजांमध्ये असंतोषाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष आणि पद्मश्री पदक विजेते ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माने यांच्या आम्ही संवाद साधला.