

Women’s Reservation Bill: A Political Gamechanger Ahead of 2029 Elections
esakal
भारतीय राजकारणाच्या इतिहासात आजवर अनेक निर्णायक क्षण आले आहेत. संविधान सभेपासून ते आजच्या संसदेपर्यंत महिलांनी नेहमीच देशाच्या भविष्य घडवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. संविधान सभेत एकूण १५ महिला सदस्य होत्या. त्या सर्वांनी संविधानाच्या मसुद्याला आकार देण्यात आणि राष्ट्राच्या भविष्यातील स्वप्नांना वास्तवात उतरवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यानंतरच्या काळात महिलांनी संसदेत प्रवेश केला. भारतीय लोकशाहीच्या सात दशकांच्या प्रवासात संसदेच्या रचनेत अनेक बदल झाले, पण आता एक अभूतपूर्व आणि अंतिम टप्प्यातील मोठा बदल समोर येत आहे. हा बदल म्हणजे नारी शक्ती वंदन अधिनियम.