

Aravalli hills in Poshina, North Gujarat, with a river flowing through the lush green landscape, showcasing the range's role in supporting water bodies and preventing desert spread.
esakal
कल्पना करा की उत्तर भारतात हिरवीगार टेकड्या नसत्या तर? थारचे भयानक वाळवंट पूर्वेकडे पसरले असते, पावसाचे ढग विना अडथळा सरकले असते आणि करोडो लोकांच्या जीवनात दुष्काळ आणि धुळीच्या वादळांचा कहर माजला असता. ही कल्पना नाही, तर भविष्यातला धोका आहे. भारतातील सर्वात जुनी अरवली पर्वतरांगा आज धोक्यात आहे. चार राज्यांमधील २९ जिल्ह्यांची ही जीवनरेखा ५ कोटी लोकांसाठी हवा, पाणी आणि जैवविविधतेचे रक्षण करते. पण बेकायदेशीर खाणकाम आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निर्णयामुळे या हिरव्या ढालीला मोठा धक्का बसला आहे. चला या पर्वतरांगेची कहाणी जाणून घेऊया आणि ही नसल्यास काय परिणाम होतील किंवा झाले असते जाणून घ्या