नाशिकसह 6 जिल्ह्यांत 1 मेपासून आरोग्य तपासणी 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 April 2017

नाशिक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार स्वस्थ महाराष्ट्र घडविण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. गरीब, गरजूंच्या आरोग्याच्या तपासणीची मोहीम पहिल्या टप्प्यात नाशिकसह पालघर, अकोला, बीड, चंद्रपूर, सांगली जिल्ह्यांत 1 मेपासून राबवण्यात येणार आहे. ही मोहीम 27 मेपर्यंत चालेल, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. 

मोहिमेसाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत आरोग्य तपासणी कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी आशा, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, सरपंच आणि स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, समाजसेवक यांच्यातर्फे रुग्ण जागृती करण्यात येईल. शहरी भागामध्ये प्रत्येक प्रभागातील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत कक्ष असतील. मोहिमेसाठी राज्य आणि जिल्हा स्तरावर समिती स्थापन करण्यात येणार आहे. महाजन हे राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष असतील. 

विनामूल्य वैद्यकीय सुविधा 

गरजू रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी आवश्‍यक वैद्यकीय सुविधा सरकारच्या योजनांमधून विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. सरकारी योजनांचा लाभ मिळू शकणार नसल्यास मुख्यमंत्री सहायता निधीतून उपचारांसाठी मदत मिळण्यासाठी जिल्हा समितीने प्रस्ताव सादर करावयाचे आहे. त्यासाठी स्वतंत्र रुग्ण सहायता कक्ष स्थापन केला जाणार आहे. वरील दोन्ही ठिकाणी पुरेशी मदत न मिळाल्यास सामाजिक संस्था, असरकारी संस्था, सामुदायिक सामाजिक दायित्व निधीद्वारे उपचार मदत उपलब्ध करून देण्यात येईल. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health inspection on May 1 in Nashik