esakal | #FamilyDoctor संधिवात
sakal

बोलून बातमी शोधा

#FamilyDoctor संधिवात

#FamilyDoctor संधिवात

sakal_logo
By
डॉ. नीलेश पाटील, डॉ. पराग संचेती

हृदयरोग, मधुमेह, कर्करोग, पक्षाघात (स्ट्रोक) व संधिवात या पाच आजारांपैकी संधिवाताविषयी जागरूकता कमी व गैरसमज जास्त आहे. त्यामुळे शरीरातील आजार कमी व गैरसमज जास्त आहेत. त्यामुळे आजार शरीरातील सगळ्या सांध्यामध्ये पसरतो. पांगळेपणा येतो. लवकर निदान व योग्य उपचाराने संधिवात पूर्णपणे बरा होतो.

संधी म्हणजे सांधा. सांध्याचे मुख्य कार्य म्हणजे हालचाल. सांधा दुखणे व हालचालींमध्ये बाधा येणे याला आपण संधिवात असे म्हणतो.

हृदयरोग, मधुमेह, कर्करोग, पक्षाघात (स्ट्रोक) व संधिवात या पाच आजारांपैकी संधिवाताविषयी जागरूकता कमी व गैरसमज जास्त आहे. त्यामुळे शरीरातील आजार कमी व गैरसमज जास्त आहेत. त्यामुळे आजार शरीरातील सगळ्या सांध्यामध्ये पसरतो. पांगळेपणा येतो. लवकर निदान व योग्य उपचाराने संधिवात पूर्णपणे बरा होतो. संधिवात एक व्यापक संज्ञा आहे. त्यात शंभरहून अधिक आजार येतात. संधिवाताचे जे दोन मुख्य आजार आपण बघतो ते म्हणजे १) झिजेचा संधिवात, २) जे सुजेचा संधिवात, ३) झिजेचा संधिवात म्हणजे झिजेमुळे हे सांधे दुखतात व अकार्यक्षम बनतात. या झिजेच्या संधिवातामुळे सर्वांत जास्त खराब होणार सांधा म्हणजे गुडघा.

१) लक्षणे - चालताना, जिना चढताना, उतरताना दुखणे, गुडघ्याला वारंवार सूज येणे, जास्त वेळ बसल्यानंतर आखडणे ही 

याची लक्षणे आहेत. ऑस्टोआर्थारायटिस म्हणजे वयोमानानुसार होणारा आजार.

२) आता दुसरा प्रकार म्हणजे सुजेचा संधिवात - हा आजार जास्त गंभीर, लक्ष न दिल्यास एक एक करून सर्व सांधे खराब होतात. आमवातामुळे म्हणजे सांध्यामधील अस्तराचा दाह निर्माण होतो व सांध्यांना सूज येते. कुठल्याही सांध्याला सूज येणे, सकाळी उठल्यानंतर अर्धा ते एक तास सांधे आखडणे, एक किंवा एकापेक्षा जास्त सांध्यांना सूज येणे, थकवा जाणवणे, सौम्य ताप येणे.

आजार कोणाला होतो?
लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कुणालाही होऊ शकतो. हा आजार काहीसा आनुवांशिक आहे. परंतु यासाठी आई किंवा वडील यांना आजार असायलाच हवा असे नाही.

हा आजार पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक असतो. एक पुरुष, तर चार स्त्रिया अशा प्रमाणात हा आजार आहे.

योग्य उपचार न घेतल्यास?
सांध्यामध्ये वारंवार सूज आल्यामुळे कूर्चा व अस्थी यांची झीज होते व सांध्यांमध्ये व्यंग निर्माण होते व सांधे वेडीवाकडे होतात, तसेच हा आजार सांध्यापुरता मर्यादित न राहता बऱ्याच अवयवांवर दुष्परिणाम करतो.

कुठल्या अवयवांवर दुष्परिणाम?
सांध्याबरोबर हा आजार फुफ्फुसांवरही दुष्परिणाम करतो. फुफ्फुसे आकुंचन पावतात व पेशंटला चालताना धाप लागते. कोरडा खोकला असणे, पायावर सूज येणे असली लक्षणे जाणवतात.

डोळे व तोंड - डोळ्यांमध्ये आसू कमी झाल्यामुळे डोळे चुरचुरणे, चिकटपणा येणे, डोळ्यांमध्ये माती गेल्यासारखे वाटणे व तोंडाला सारखी कोरड पडणे, सारखे सारखे तोंड येणे, तोंडाला जखमा होणे.

शरीरातील रक्त - रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे थाप लागणे, अशक्‍यपणा जाणवणे या गोष्टी होतात. त्वचा कोरडी पडणे व त्वचेवर भरून न येणाऱ्या जखमा होणे.

आमवाताचे निदान?
ज्या वेळी रुग्ण या डॉक्‍टरकडे जातात, त्या वेळी ते डॉक्‍टर या रुग्णाला व्यवस्थित तपासतात व लक्षणांचे मूल्यमापन करतात, त्यानंतर मोजक्‍याच अशा तपासण्या करायला सांगतात. लक्षणांचे मूल्यमापन व रक्त तपासणी या आधारे ते आजाराचे निदान करतात.

औषधाने हा आजार जातो का?
कुठल्याही औषधाने हा आजार समूळ नष्ट होत नाही. परंतु औषध योग्य प्रमाणात व तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्याने घेतल्यास आजार पूर्णपणे बरा होतो. योग्य वेळी म्हणजेच आजाराची लक्षणे दिसताच योग्य डॉक्‍टरकडे गेल्यास, औषधोपचार लवकर करता येतो व रुग्ण लगेच पूर्णपणे बरा होतो.

ही औषधे किती दिवस घ्यावी लागतात?
सुरवातीला सांगितल्याप्रमाणे हा आजार जीर्ण प्रकारात मोडतो म्हणजेच औषधे बरीच वर्षे घ्यावी लागतात. परंतु त्यातील काही रुग्णांना पूर्णपणे बरा झाल्यानंतर एक किंवा दोन गोळ्यांवरच आराम मिळतो. बऱ्याच वेळा आम्ही तोसुद्धा बंद करण्याचा प्रयत्न करतो.

या औषधांचे काही दुष्परिणाम आहेत का?
जनमानसात या आजाराबाबत व औषधांबद्दल अशी भीती आहे, की या औषधांचे दुष्परिणाम (साइड इफेक्‍ट) असतात आणि मूत्रपिंड व यकृत खराब होते. पण यात काहीही तथ्य नाही. किंबहुना, या औषधांमुळे निकामी होणारे अवयवसुद्धा व्यवस्थित होतात. त्यामुळे मूत्रपिंड व यकृत खराब होण्याची भीती बाळगण्याचे कारण नाही.

या औषधांमध्ये स्टिरॉइड्‌स व पेनकिलर्स असतात?
स्टिरॉइड्‌स व पेन किलर्सचा या आजारात फार उपयोग नाही, तसेच ते जास्त वापरत नाही.

आजाराच्या सुरवातीला काही रुग्णांमध्ये काही दिवस कमी कमी प्रमाणात वापरावे लागते. या आजारात खाण्यापिण्यावर बंधने आहेत का?
खाण्यापिण्याबाबत बरेच गैरसमज आहेत. कुठलेही खाणे वर्ज्य करण्याची गरज नाही. रुग्ण आंबट ताक, दही, लिंबी असे सर्व पदार्थ खाऊ शकतो.
तळलेले पदार्थ मात्र टाळावे. मांसाहारसुद्धा चालतो. विशेषतः मासे आरोग्यासाठी चांगले असतात.