गर्भसंस्कार पुरस्कार २०२२ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Child

ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या २८ जून या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी ‘गर्भसंस्कार पुरस्कार’ हा कार्यक्रम आयोजित केला जातो.

गर्भसंस्कार पुरस्कार २०२२

ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या २८ जून या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी ‘गर्भसंस्कार पुरस्कार’ हा कार्यक्रम आयोजित केला जातो. याही वर्षी मंगळवार दिनांक २८ जून २०२२ रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. गर्भसंस्कार करून जन्माला आलेल्या बालकाचा गौरव व्हावा, त्याच्या माता-पित्यांनी केलेल्या संस्कारांची, घेतलेल्या परिश्रमांची पावती मिळावी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गर्भसंस्कारांचा अपला अनुभव अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावा यासाठीचे हे एक उत्तम व्यासपीठ होय. या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्यात १ जून २०१९ ते ३० जून २०२१ या कालावधीत जन्म झालेल्या बालकांना सहभागी होता येईल. कृपया पालकांनी www.garbhasanskar.in या संकेतस्थळी जाऊन फॉर्म भरावा किंवा आपल्या बालकाच्या संपूर्ण प्रगती विषयीची माहिती खालील मुद्यांच्या मदतीने भरून २० जून २०२२ पूर्वी पाठवावी.

प्रवेशिका माहितीपत्रक

१. बालकाचे व मातापित्यांचे अ) संपूर्ण नाव, ब) पत्ता, क) ई-मेल, ड) टेलिफोन नं., इ) मोबाईल नं.

२. माता-पित्याची जन्म व लग्नाची तारीख

३. माता-पित्याचे शिक्षण

४. बालकाची जन्मतारीख, जन्मस्थळ व जन्मवेळ

५. अर्जाबरोबर माता-पिता व बालकाचे फोटो पाठवावे.

६. बालकाचा जन्म कितव्या आठवड्यात झाला? प्रसूतीचा प्रकार - नैसर्गिक का सीझर? सीझर झाले असल्यास कारण.

७. जन्मतःच बालकाचे वजन व विशेष गुण

८. गर्भधारणेपूर्वी माता-पित्यांनी कोणती काळजी घेतली व काय संस्कार केले ?

९. गर्भधारणेच्या नऊ महिन्यांमध्ये कोणकोणते संस्कार केले व आहारात बदल, योगासने वगैरे काय काळजी घेतली ?

१०. डोहाळे कुठल्या प्रकारचे होते? काही डोहाळे कडक होते का?

११. गर्भारपणात कोणती औषधे घेतली, कोणती ‘संतुलन उत्पादने’ घेतली?

१२. गर्भारपणात श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांचे ‘गर्भसंस्कार’ संगीत ऐकले होते का?

१३. गर्भारपणात आईला काही विशेष अनुभव आले का?

१४. अपत्यामध्ये दिसलेले प्रगतीचे टप्पे व विशेष गुण (माईल स्टोन) यांची सविस्तर माहिती म्हणजे महिन्याप्रमाणे असलेले प्रगतीचे टप्पे उदा. टक लावून पाहणे, कुशीवर होणे, आई-बाबांना ओळखणे, पालथे पडणे, दात येणे, रांगणे, चालणे वगैरेंची माहिती द्यावी.

१५. जन्मानंतर बाळाला ‘सुवर्णप्राशन संस्कार’ केला होता का?

१६. बाळ-बाळंतिणीची काय काळजी घेतली?

१७. श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांनी लिहिलेल्या ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ या पुस्तकातील मार्गदर्शनाचा कितपत उपयोग करून घेतला?

१८. अपत्याच्या प्रगतीच्या टप्प्यांचे पुरावे म्हणून फोटो, व्हिडिओ क्लिप्सची सीडी, फोटो वगैरे पाठवावे. प्रवेशिका पाठविण्याची शेवटची तारीख - २० जून २०२२

माहिती पाठविण्याचा पत्ता

१. संतुलन आयुर्वेद, आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला ४१० ४०५, मो.क्र. ९६८९९२६००२ इ मेल : atma@santulan.in

२. संतुलन आयुर्वेद, ११७०/ ५, कार्तिक चेंबर्स, शिवाजीनगर, पुणे ४११ ००५ टे. क्र. ०२० २५५३ ५१८८

Web Title: Article Writes Garbhsanskar Award 2022 Event

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top