किशोरावस्थेतील भावनिक समस्या

आपल्या पाल्याला अशा कुठल्याही प्रकारचे मानसिक अथवा भावनिक आजार होणार नाहीत, यासाठी जागरूक असणे आवश्यक आहे.
किशोरावस्थेतील भावनिक समस्या
किशोरावस्थेतील भावनिक समस्या sakal

- : डॉ. अश्विनी घुगळे (पुणे)

किशोरवयातील मुलांकडे, त्यांच्यात होणाऱ्या मानसिक बदलांकडे पालक म्हणून आपण विशेष लक्ष देणे आवश्यक असते. अनेकदा या बाबतीत आपण जाहीर बोलणे अथवा चर्चा करणे टाळतो, वाचणे, लिहिणे टाळतो. परंतु या विषयावर जास्तीत जास्त बोललं पाहिजे, माहिती घेतली पाहिजे आणि आपल्या पाल्याला अशा कुठल्याही प्रकारचे मानसिक अथवा भावनिक आजार होणार नाहीत, यासाठी जागरूक असणे आवश्यक आहे.

‘किशोरावस्था’ म्हणजे आयुष्यातील एक अशी नाजूक अवस्था जिथे मुलं प्रथमच नवं-नवीन भावना, विचार,अपेक्षा आणि बाह्य-अंतर्गत शारीरिक घडामोडींना सामोरे जातात. या अवस्थेतील महत्त्वाची पायरी असते sexual maturity. मुलींमध्ये १० ते १४, तर मुलांमध्ये १२ ते १५ वयोगटात शरीरातील नैसर्गिक घड्याळ सुरू होते आणि मग लैंगिक अवयव विकसित होण्यास चालना मिळते व १८ - २० वर्षापर्यंत सर्व Sexual organs matured होतात. मुलें अशा लैंगिक विकासातून जात असताना; नवजात शिशूप्रमाणेच त्यांना सांभाळावे लागते. कारण १० व्या वर्षापासून ते २० व्या वर्षापर्यंत लैंगिक - बौद्धिक - भावनिक वाढ परिपूर्ण होत असते.

या वयोगटातील अनेक पाल्यांच्या पालकांना प्रश्न पडतो, ‘‘माझं मुलं ज्या काही प्रमाणे वागत आहे, ते नॉर्मल आहे किंवा नाही?’’ म्हणूनच आधी नॉर्मल असणे म्हणजे काय, याचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. जर तुमची मुलं हट्टी, खोडकर, आपलंच म्हणणं खरं करणे, छोट्या मोठ्या गोष्टींचे कुतूहल, खाण्यापेक्षा खेळण्याकडे जास्त लक्ष, शाळेतील आभ्यासापेक्षा मित्र-मैत्रिणींना जास्त वेळ देणे, पालेभाज्या -फळं खाण्या ऐवजी पिझ्झा, बर्गर, सँडविचेस, चटपटीत पदार्थ जास्त खाणे, शाळेतील परीक्षेपेक्षा स्पोर्ट््स, क्रिकेट, चित्रकला, नृत्य इत्यादी गोष्टींना जास्त महत्त्व देणे आणि सगळ्यात महत्त्वाचं विरुद्ध लिंग आकर्षण असे काही बदल दिसत असल्यास तुमची मुले नॉर्मल आहेत, त्यांना कोणताही विकार नाही. परंतु वरील सर्व वैचारिक परिवर्तन त्यांच्या मूळ स्वभावाला बदलवत असेल तर योग्य वेळी डॉक्टर व समुपदेशकाचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक असते. त्याच प्रमाणे कौटुंबिक मनोविकाराचा इतिहास, कौटुंबिक प्रतिकूलता, भावंडांमधील वैर, समवयस्कांचा दबाव, शरीराची प्रतिमा समस्या, शाळेतील गुंडगिरी, डेटिंग, अपमानास्पद संबंध, किशोरवयीन गर्भधारणा, खाण्याचे विकार इत्यादी विविध समस्यांमुळे किशोरवयीन मुलांमध्ये काही मानसिक विकार बऱ्याच वेळेस दिसून येतात. ते पुढीलप्रमाणे...

१. चिंता विकार (Anxiety): प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा अतिविचार व चिंता, नकारात्मक विचार, चार लोकांमध्ये जाण्याची भीती आणि या सोबतच हृदयाचे जलद ठोके, हातापायाला थंड घाम, पोटात कासावीस होणे, हाथ पाय थरथरणे, चक्कर येणे, जीव घाबराघुबरा होणे, डोळ्यांसमोर अंधारी इत्यादी शारीरिक लक्षणेसुद्धा दिसून येतात. जी मुलेे मुलतःच लाजाळू, भिडस्त असतात अशांमध्ये हा विकार लवकर दिसून येतो, तर काही मुले आयुष्यातील काही अनुभवानंमुळे अशी बनतात.

२. मूड डिसऑर्डर : यामध्ये समायोजन विकार आणि नैराश्य दिसून येते. समायोजन विकार म्हणजे जिथे मुलें बऱ्याच वेळेस परिस्थितीशी जुळवा जुळव करून घेण्यास नाकारतात. त्यामुळे कमकुवत नाती संबंधी, कौटुंबिक प्रतिकूलता, शुल्क गोष्टीवरून आक्रमक होणे, इतर मुलांशी खेळणे अवघड जाणे आणि कमजोर आकलन शक्ती दिसून येते, तर नैराश्यमध्ये मुलांचा साधारणतपणे सर्वच क्रियांमधील आवड, रस, गोडी कमी होत जाते. मुलांना आपण स्वतः दोषी असल्याची भावना मनात खदखदत असते आणि आता आपल्या जगण्याला काहीच अर्थ नाही/ जगण्याचा हक्क नाही, मृत्यू हा एकमेव मार्ग असे विचार घोंघावत राहतात. बऱ्याचदा याचे कारण शोधून काढणे अवघडच जाते परंतु येथे कौटुंबिक इतिहासही तेवढाच महत्वाचा असतो.

३. अवधान अस्थिरता आणि अतिचंचलता अवस्था (ADHD) : हा एक मेंदूचा विकार असून, लक्ष केंद्रित न होणे, आभ्यासात व कामात सततच्या सरावा खेरीज छोट्या छोट्या चुका होणे, प्रश्न पूर्ण होण्या आधीच उत्तर देणे, कोणतेही काम जबाबदारीने न स्वीकारणे, विसराळूपणा, अतिक्रियाशीलता, बसल्या जागी उड्या मारणे, वाचाळता, अस्थिरता, अशा मुलांना भावनांना नियंत्रित ठेवणेदेखील कठीण जाते.

४. व्यवहार विकार (Behavioural Disorder) : हा विकार मुलींपेक्षा मुलांमध्ये जास्त दिसून येतो. येथे मुले काही मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करताना दिसतात. मारामारी, धमकावणे, चोऱ्या माऱ्या, लैंगिकदृष्ट्या गैरव्यवहार, शाळा वा कार्यक्षेत्रात गैरव्यवहार. या वर्तवणुकीमुळे बलात्कार, किशोरवयीन गर्भधारणा, लैंगिक संसर्गाचा रोग अशा समस्यादेखील उभ्या राहतात. तर काही मुलें अतिशय उर्मट, लबाडी करणे, त्यांच्या चुकांसाठी दरवेळेस इतरांना कारणीभूत ठरवणे, प्रत्येक लहान मोठ्यांशी भांडण तंटे करणे असे दिसून आल्यास या कडे दुर्लक्ष करू नये.

५. आत्महत्या : नैराशेतील अनेक किशोरवयीन मुलें आत्महत्येची पायरी चढतात. त्यामुळे किशोरवयातील कोणत्याच मानसिक समस्सेला दुर्लक्षित न करता वेळेच्या आधीच होमिओपॅथिक उपचार व कौन्सेलिंग सुरू करणे योग्य ठरते.

होमिओपॅथी ही नैसर्गिक उपचार पद्धती आहे. ही औषधे शरीरातील अति सूक्ष्म पेशींपर्यंत पोहचून नुसते शारीरिकच नव्हे तर मानसिक विकारांमध्येसुद्धा जलदगतीने सकारात्मक बदल घडवतात. एवढंच तर होमिओपॅथीक डॉक्टर रुग्णाची सखोल माहिती घेऊन प्रत्येक लक्षणांचा बारकाईने अभ्यास करतो व त्या व्यक्तीच्या शारीरिक प्रकृतीला साजेसे औषध निवडले जाते, त्यामुळे रोग मूलतः बरा होतो. मानसिक रुग्णांना होमिओपॅथिक औषधी जलद लागू पडते व शरीरावर त्याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. रुग्ण या औषधांच्या आधीन न जाता मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सक्षम बनतो. मुलांनमध्ये मनोविकार आढळ्यास सर्वांगीण विकासासाठी मुलांना योग्य तो आहार, व्यायाम, योगासने व ध्यान याबाबतीत जागृक करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com