परीक्षा

डॉ. श्री बालाजी तांबे
Monday, 4 March 2019

ऐन परीक्षेचे दिवस जेवढे महत्त्वाचे तेवढेच परीक्षेच्या आधीचे दिवसही महत्त्वाचे असतात. संपूर्ण कालावधीमध्ये शारीरिक आरोग्य व मानसिक संतुलन या दोन्ही गोष्टींकडे लक्ष ठेवणे आवश्‍यक असते. वर्षभर छान अभ्यास केला असला तरी नेमक्‍या परीक्षेच्या काळात आजारपण आले तर बघता बघता सगळ्या श्रमांवर पाणी पडू शकते. परीक्षेच्या आधी व परीक्षेच्या दिवसांत संपूर्ण वर्षाच्या तुलनेत जास्ती अभ्यास करणे भाग असते. मात्र यासाठी रात्री जागरणे करण्याऐवजी सकाळी लवकर उठणे अधिक श्रेयस्कर असते.

ऐन परीक्षेचे दिवस जेवढे महत्त्वाचे तेवढेच परीक्षेच्या आधीचे दिवसही महत्त्वाचे असतात. संपूर्ण कालावधीमध्ये शारीरिक आरोग्य व मानसिक संतुलन या दोन्ही गोष्टींकडे लक्ष ठेवणे आवश्‍यक असते. वर्षभर छान अभ्यास केला असला तरी नेमक्‍या परीक्षेच्या काळात आजारपण आले तर बघता बघता सगळ्या श्रमांवर पाणी पडू शकते. परीक्षेच्या आधी व परीक्षेच्या दिवसांत संपूर्ण वर्षाच्या तुलनेत जास्ती अभ्यास करणे भाग असते. मात्र यासाठी रात्री जागरणे करण्याऐवजी सकाळी लवकर उठणे अधिक श्रेयस्कर असते.

मार्च महिना आणि परीक्षा यांचे नाते अतूट असते. या दिवसांत वातावरणातील नुसती उष्णताच नाही तर ताणही वाढलेला जाणवतो. वर्षाच्या शेवटी परीक्षा येणे स्वाभाविक असले तरी ती जेव्हा उंबरठ्यावर येऊन उभी ठाकते, तेव्हा तिचा ताण आल्याशिवाय राहात नाही. सध्याची वाढती स्पर्धा पाहता विद्यार्थ्याच्या बरोबरीने त्यांच्या पालकांचाही परीक्षा आहे की काय असे वाटते.

ऐन परीक्षेचे दिवस जेवढे महत्त्वाचे तेवढेच परीक्षेच्या आधीचे दिवसही महत्त्वाचे असतात. संपूर्ण कालावधीमध्ये शारीरिक आरोग्य व मानसिक संतुलन या दोन्ही गोष्टींकडे लक्ष ठेवणे आवश्‍यक असते. 

वर्षभर छान अभ्यास केला असला तरी नेमक्‍या परीक्षेच्या काळात आजारपण आले तर बघता बघता सगळ्या श्रमांवर पाणी पडू शकते. तसेच सगळे माहिती असले तरी ऐन परीक्षेच्या वेळेला मनावर अवाजवी ताण आल्याने निम्मेच लिहिता आले, प्रश्नाचे उत्तर माहिती असूनही शिक्षकांच्या समोर काहीच उत्तर देता आले नाही, अशासारखी उदाहरणेही असतात. 

वर्षभर अभ्यास करणे हे सर्वांत उत्तम असतेच, तरीही परीक्षेच्या आधी व परीक्षेच्या दिवसांत संपूर्ण वर्षाच्या तुलनेत जास्ती अभ्यास करणे भाग असते. यासाठी रात्री जागरणे करण्याऐवजी सकाळी लवकर उठणे अधिक श्रेयस्कर असते. ब्राह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वीचा एक-दीड तास हा काळ अभ्यास, ध्यान, योग, उपासना यासाठी उत्तम समजला जातो कारण या काळात वातावरणातील तरंग असे असतात की मन चांगल्या प्रकारे एकाग्र होऊ शकते. तेव्हा अभ्यास चांगला व्हावा व नंतर कायम लक्षात राहावा यासाठी सकाळी उठून अभ्यास करणे उत्तम होय. परीक्षेच्या आधी अभ्यासासाठी अधिकाधिक वेळ काढणे अत्यावश्‍यक असले तरी यासाठी झोपेचा बळी न देणे चांगले होय. विद्यार्थिदशेतील मुलामुलींनी किमान सात तास तरी शांत झोपणे आवश्‍यक असते. मेंदू, मन, शरीर या सर्वांना विश्रांती मिळण्यासाठी शांत झोप गरजेची असते. अभ्यासाच्या अतिरेकात याकडे दुर्लक्ष झाले तर ऐन परीक्षेत आजारपण येण्याची शक्‍यता वाढते. 

शांत व पुरेशी झोप मिळण्याकडे जसे लक्ष ठेवायचे असते तसे आहारातही विशेष बदल करणे आवश्‍यक होय. साधारण दीड-दोन महिने आधीपासूनच आहार साधा, पचायला हलका व सात्त्विक असण्यावर भर देणे, बाहेरचे पदार्थ किंवा घरातही वारंवार हॉटेलमधल्यासारखे खाणे टाळणे चांगले. आहारात मनाची एकाग्रता साधता येण्याच्या दृष्टीने, बुद्धी व स्मरणशक्‍तीला ताकद देणारे तसेच प्रतिकारशक्‍ती टिकवून ठेवणारे दूध, पंचामृत, भिजविलेले बदाम वगैरेंचा आवर्जून समावेश असावा. जेवण टाळून अभ्यास करण्याचा अट्टहास न करणेच चांगले. वेळच्या वेळी केलेले जेवण अभ्यासाला पूरकच ठरते. 

परीक्षेच्या दिवसांत प्यायचे पाणी उकळलेले असणे आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे सुवर्णसिद्ध केलेले असणे उत्तम होय. सुवर्ण हे प्रतिकारशक्‍ती चांगली ठेवते, बुद्धी, स्मरणशक्‍ती, आकलनशक्‍ती सुधारणारे असते, मेंदू, हृदय या महत्त्वाच्या अवयवांना पोषक असते. त्यामुळे खरे तर संपूर्ण वर्षभर, घरातल्या सर्वांनीच सुवर्णसिद्धजल पिणे उत्तम असते, निदान परीक्षेच्या दिवसांत तरी २४ कॅरटच्या सोन्याचा पत्रा किंवा व वापरलेले वेढणे पाण्याबरोबर उकळून तयार केलेले सुवर्णसिद्धजल दिवसभर पिण्यासाठी वापरता येईल. 

परीक्षेच्या काळात व परीक्षेच्या आधी अभ्यासाच्या गडबडीत शारीरिक हालचाल पुरेशी न झाल्याचा परिणाम पचनावर होऊ शकतो. त्यामुळे भूक व्यवस्थित लागते आहे व पोट साफ होते आहे याकडे लक्ष ठेवणे आवश्‍यक, अन्यथा अपचनामुळे कित्येकदा शरीर व मन आळसावते व अभ्यास करावासा वाटत नाही. जेवणाच्या आधी आल्याचा छोटा तुकडा सैंधवासह खाणे, रात्री झोपण्यापूर्वी कपभर गरम पाण्यात दोन चमचे साजूक तूप टाकून घेणे, रात्री झोपण्यापूर्वी अविपत्तिकर चूर्ण घेणे, सॅनकूल चूर्ण घेणे अशा साध्या उपायांनी पोट व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करता येतो. 

अभ्यास झालेला असतानाही परीक्षेच्या वेळेला विनाकारण ताण येणार नाही यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःच थोडे प्रयत्न करायला हवेत. उदा. सकाळ-संध्याकाळ दहा मिनिटे डोळे बंद करून शांतपणे बसणे, ॐकार म्हणणे किंवा रात्री झोपण्यापूर्वी पाच-दहा मिनिटे मन शांत करणारे स्वास्थ्यसंगीत ऐकणे वगैरे गोष्टींचा मानसिक धीर वाढायला निश्‍चित मदत होऊ शकेल.

प्राणायाम, दीर्घश्वसनासारख्या गोष्टी शिकलेल्या असल्या तर त्याही करण्याचा चांगला उपयोग होतो. प्राणायामामुळे प्राणवायू जास्तीत जास्ती आत ओढता येतो, आत साठवता येतो व फुप्फुसातला अशुद्ध वायू बाहेर टाकला जातो. मेंदूचे कार्य व्यवस्थित चालू राहण्यासाठी मेंदूत असलेल्या सेरेब्रो स्पायनल फ्लुइडला (सोमरस) व चेतातंतूंना शक्‍ती पुरवणे खूप महत्त्वाचे असते, जे कपालभाती, भस्रिका व प्राणायामामुळे साध्य होते. म्हणून विद्यार्थ्यांना रोज पंधरा-वीस मिनिटे हा सराव करणे फायद्याचे ठरते. ‘संतुलन क्रियायोगा’तील साध्या सोप्या क्रिया, नौकासन, शलभासन वगैरे सोपी आसने करावीत. 

शारीरिक उष्णता वाढल्यास डोळ्यांची आग होणे, तोंड येणे, डोके दुखणे वगैरे त्रास उद्भवतात. यावर अधे मधे डोळ्यावर थंड पाणी मारणे, सकाळी उठल्यावर तोंडावर थंड पाण्याचे हबके मारणे, डोळ्यांवर दुधाच्या वा गुलाबपाण्याच्या घड्या ठेवणे, डोळ्यांवरचा ताण नाहीसा करणारे ‘सॅन अंजन’सारखे अंजन घालणे, अति चमचमीत, अति तिखट व तेलकट पदार्थ खाणे टाळणे, औषधी तुपाचे दोन-तीन थेंब रात्री झोपण्यापूर्वी नाकात व कानात घालणे, दिवसभर नाही तर निदान रात्री झोपण्यापूर्वी ‘ब्रह्मलीन तेला’सारखे तेल टाळूवर चोळणे वगैरे सोपे सोपे इलाजही असतात. 
पादाभ्यंग हा सुद्धा परीक्षेच्या काळात वरदान ठरेल असा उपचार होय.

तळपायांना औषधी किंवा घरचे साजूक तूप लावून शुद्ध काशाच्या वाटीने पाय चोळणे म्हणजे पादाभ्यंग. दहा मिनिटे उजवा  व दहा मिनिटे डावा अशा प्रकारे दोन्ही पाय चोळण्याने ताण कमी होतो, मेंदूचा थकवा कमी होते, डोळ्यांना ताकद मिळते, शरीरातील अतिरिक्‍त उष्णता कमी होते असा अनुभव आहे. त्यामुळे घरातील कोणीतरी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना पादाभ्यंग करून दिला तर त्याचे मानसिक, शारीरिक संतुलन चांगले राहण्यास मदत मिळते. 

परीक्षेच्या आधीपासूनच मेंदूची ताकद वाढावी, केलेला अभ्यास चांगल्या प्रकारे लक्षात राहावा, एकाग्रता वाढावी यासाठी काही आयुर्वेदिक औषधे व काही साध्या आयुर्वेदिक पाककृती उपयोगी पडू शकतात. उदा. ब्राह्मी, शंखपुष्पी, वेखंड वगैरे बुद्धी-स्मृतिवर्धक वनस्पतींपासून बनविलेले ‘ब्रह्मलीन सिरप’ परीक्षेच्या अगोदरपासून घेण्याचा चांगला उपयोग होतो. बरोबरीने ‘सॅन ब्राह्मी’ गोळ्या किंवा ‘मॅरोसॅन’सारख्या गोळ्याही एकाग्रता वाढविण्यासाठी,लक्षात राहण्यासाठी उत्तम परिणाम दाखवतात. रोज सकाळी पंचामृत तर घ्यावेच, बरोबरीने बदाम-केशर दूध, ‘संतुलन शतदाम’ घेण्याचाही चांगला उपयोग होतो.

पालकांनी व घरातील इतर व्यक्‍तींनीही परीक्षेच्या आधी व परीक्षेच्या काळात तारतम्याने वागणे म्हणजे घर छोटे असल्यास घरातल्या सर्वांनीच टी. व्ही. बघणे, गप्पा मारणे वगैरे गोष्टींवर नियंत्रण ठेवणे, ज्या गोष्टींनी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याच्या मनात चलबिचल होईल त्या गोष्टी आपणही करायला नकोत याचे भान ठेवणे चांगले. तसेच विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढेल, त्याच्या मनातील भीती कमी होईल असे मोकळे वातावरण ठेवणे हे सुद्धा आवश्‍यक. 

परीक्षा म्हणजे काही तरी भयंकर, त्रास देण्यासाठी केलेली गोष्ट नाही तर वर्षभर केलेल्या अभ्यासाचे फळ पदरात टाकणारी एक आवश्‍यक गोष्ट आहे. त्यामुळे शांत मनाने, आत्मविश्वासाने व पूर्ण तयारीने परीक्षेला सामोरे गेले तर व यशाचे मानकरी होता येईल.

सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व नंतरच्या यशासाठी अनेक शुभेच्छा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Exam Health