esakal | ‘चाहत से मजबूर’
sakal

बोलून बातमी शोधा

‘चाहत से मजबूर’

‘चाहत से मजबूर’

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com

आपल्या नेहमीच्या ‘चहा’ला पर्याय नाही. चहा सर्वमान्य आहे. चहा पिऊन फार मोठे नुकसान होते असे नाही, तरीही दिवसभर चहा पिणेही चांगले नाही. चहामुळे मैत्रीचे दाट नाते तयार होते. चहा मात्र दाट नसावा. ‘चाहत’ हा शब्द चहावरून तयार झालेला आहे असे वाटते. चहा घेण्याची चाहत तयार व्हायला हवी.

‘चाहत से मजबूर’ असे हिंदीत म्हटले तरी बहुतेक मराठी भाषिकांना कळते, कारण प्रत्येकाला चहा माहीत असतो आणि त्याबद्दलची मजबुरी त्यांच्या अनुभवाची असते. चहाशिवाय अनेकांचे अडते. अनेकांचा दिवस चहा मिळेपर्यंत सुरूच होत नाही. सकाळी चहा घेतल्याशिवाय बऱ्याच जणांची झोप उडत नाही, चहा घेतल्याशिवाय बऱ्याच जणांना शौचाला होत नाही. तेव्हा मुखमार्जनादी करण्यापूर्वी बऱ्याच जणांना चहा हवा असतो. ‘बेड टी’ अस्तित्वात यायचे कारणच हे आहे. अंथरुणातून उठण्यापूर्वी चहा मिळाला तरच अनेकांना अंथरुण सोडण्याची प्रेरणा मिळते. अशी प्रेरणा देणारा हा चहा!

भारताने चहा सर्व जगभर पसरवलेला आहे, त्याला आज इतकी मान्यता मिळालेली आहे की, भारतीयांचेच नव्हे तर जगभरात अनेकांचे चहावाचून अडते. चहा किती वेळा व किती घेणार? तेव्हा चहाला पर्याय शोधले आहेतच. नुसते आले व गवती चहा टाकून केलेला चहा, बडीशेप पाण्यात उकळून केलेला चहा, ग्रीन टी, वेगवेगळ्या वनस्पती पाण्यात उकळून केलेला चहा असे अनेक चहाचे प्रकार आहेत. कुठलाही का होईना, पण प्रत्येकालाच चहा हा हवाच.

रात्री झोपताना तुळशी, बेल अशा वनस्पतींची चार पाने पाण्यात टाकून ठेवायला आयुर्वेदाने सुचवले आहे. असे केल्याने पाने ताजी राहतात. दुसऱ्या दिवशी पाने देवाला वाहावी व उरलेले पाणी आपण प्यावे. याला आयुर्वेदात ‘हिम’ असे नाव दिलेले आहे, पण हा आहे एक प्रकारचा चहाच. याचा उपयोग स्वास्थ्यासाठी तर होतोच, पण काही वेळा रोगहारक म्हणूनही याचा उपयोग होतो. सध्या आपण जो चहा पितो तो बनविताना वापरलेली चहाची पत्ती वा भुकटी ही एक वनस्पतीच आहे. वनस्पती नुसत्या पाण्यात टाकून ठेवल्या तर त्यांचे गुण पाण्यात उतरतीलच असे नाही. त्यामुळे वनस्पती गरम पाण्यात टाकून, झाकून ठेवून काही वेळाने पिणे (फांट), किंवा या वनस्पती पाण्यात उकळवून, गाळून घेऊन चहा बनविता येतो. उकळण्यामुळे वनस्पतींचे गुण पाण्यात अधिक प्रमाणात उतरतात. हीच प्रक्रिया पुढे चालू ठेवून काढे, अरिष्ट, आसवे, वारुणी, मदिरा वगैरे प्रकार उत्पन्न झाले. 

परंतु आपल्या नेहमीच्या ‘चहा’ला पर्याय नाही. चहा सर्वमान्य आहे. चहा पिऊन फार मोठे नुकसान होते असे नाही, तरीही दिवसभर चहा पिणेही चांगले नाही. लहान मुलांना चहा देऊ नये असे म्हणतात, ते का? चहामुळे एक प्रकारची उत्तेजना येते. मनुष्याला मिळणारी उत्तेजना बाहेरील वस्तूवर अवलंबून असावी का? लहान मुलांच्यात एवढी उत्तेजना व प्रेरणा असते की ती स्वतः उड्या मारतातच, पण ते आजी-आजोबांनाही उड्या मारायला लावतात. अशा उत्साहपूर्ण मुलांना उत्तेजनासाठी परावलंबित्व का द्यायचे व त्यांना चहा का द्यायचा? मुलांनी चांगले दूध प्यावे हे खरे. 

चहा सर्वांनी घ्यावा का? याबाबत माझा अनुभव असा आहे - लहानपणापासून अनेक वर्षे मी चहा घेतलेला नव्हता. अगदी लग्नापर्यंत मी चहा प्यायलेलो नव्हतो. नंतर मला माझ्या उद्योगव्यवसायाच्या वेळी जंगलात जावे लागत असते. एकदा कर्नाटकात दांडेलीच्या जंगलात फिरत असताना खूप तहान लागली. मला पाणी हवे असल्याचे मी माझ्याबरोबर असलेल्या गृहस्थांना सांगितले. ते म्हणाले, ‘‘एक गोष्ट नेहमी लक्षात 

चहा बनविण्याची योग्य रीत 
एक कप पाण्यात साधारण एक सपाट चमचा साखर घालावी. पाणी उकळायला लागल्यावर त्यात एक सपाट चमचा चहाची पूड, आवडीप्रमाणे गवती चहा, आल्याचा बारीक तुकडा ठेचून, वेलची, दालचिनी, शक्‍यतेनुसार एखादे ताजे तुळशीचे पान, एखादे पुदिन्याचे पान वगैरे टाकून लगेच भांडे गॅसवरून खाली उतरावे व वर झाकण ठेवावे. शक्‍य असल्यास तीन-चार मिनिटांनी चहा गाळून घेऊन त्यात थोडे दूध टाकून घ्यावा. दालचिनी, पुदिना वगैरे द्रव्य इतक्‍याच प्रमाणात टाकावीत की चहा घेत आहे असे वाटले पाहिजे, त्यातील दालचिनीमुळे ठसका लागता कामा नये, पुदिन्याचा काढा पीत असल्यासारखे वाटू नये, आल्यामुळे घशाची आग होते आहे असे वाटू नये. फार वेळ उकळलेला दाट चहा घेऊ नये. उत्तम प्रकारे बनविलेला चहा समोरच्याला दिल्यावर मैत्री दाट होते हे मात्र नक्की. चहा करताना त्यात विशिष्ट द्रव्ये टाकल्यास खोकला, सर्दी, ताप, पोटातील गॅस यावर उपयोग होतो. असे आहे चहाचे माहात्म्य. यावर संशोधन करून आयुर्वेदात सांगितलेले वेगवेगळ्या प्रकारचे चहा - हर्बल चहाही घेता येतात.  


ठेवायची ती म्हणजे, जंगलात इकडचे तिकडचे पाणी कधीच पिऊ नये. कारण त्या पाण्याच्या शुद्धाशुद्धतेबद्दल आपल्याला काही माहिती नसते. एक करता येईल, आपण चहा घेऊ. कारण तो निदान उकळलेला असतो.’’ तसे पाहता पाणीही नेहमी उकळूनच प्यावे. न उकळता पाणी पिणे हा स्वतःवर केलेला मोठा अन्याय आहे. पाणी उकळताना त्यात वाळा, चंदन, वावडिंग, मंजिष्ठा, धणे वगैरे टाकून, जल संतुलित करून घ्यावे. नेहमी असे अग्निसंस्कार केलेले पाणी प्यावे. पाण्याची तहान चहाने भागत नाही हे खरे असले तरी जेव्हा चांगले पाणी उपलब्ध नसते तेव्हा चहा घेतला तर तात्पुरती तरी तहान भागते, मनाला शांती मिळते, थकवा दूर होतो, उत्साह वाढतो. तेव्हा मी त्या जंगलातील टपरीवर आयुष्यात प्रथम चहा प्यायलो. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करणे किंवा त्या गोष्टीची इच्छा धरून आधीन होणे माझ्या स्वभावात वा शिकवणुकीत नाही. त्यामुळे मी चहा पितो, पण त्यावाचून माझे अडत नाही. 

कुणाकडेही गेल्यावर पहिला प्रश्न असतो, ‘‘चहा, कॉफी काय घेणार?’’ तो एक आदरातिथ्याचा भाग झालेला आहे. आपण चहा, कॉफी काही घेत नसल्यास सरबत, पाण्याची विचारणा होते. तेही घेता येत नाही, कारण ते बनविताना पाणी उकळलेले असेलच याची खात्री नसते. त्यामुळे देणाऱ्यांचा हिरमोड होतो. इंग्लंड वगैरे ठिकाणी चहा, कप, किटली, टी-कोझी, चमचे, गाळणी, गाळणी ठेवण्यासाठी वाटी, टी-बॅग, दूध ठेवण्यासाठी छान भांडे वगैरे ठेवून टेबल सजवलेले असते. तेथे चहा घेणे हा एक सोपस्कार असतो. यामुळे मैत्रीचे दाट नाते तयार होते. चहा मात्र दाट नसावा. दाट चहा व तोही दिवसातून बऱ्याच वेळा घेतला की त्रासाला सुरवात होते. चहा अति उकळवला की त्यात चहातील चांगल्या गुणांबरोबरच वाईट रसायने पण ओढली जातात. म्हणून दिवसातून किती वेळा चहा घेतला यापेक्षा तो किती उकळवलेला आहे व तो तयार करून किती वेळ ठेवलेला आहे, यावर चहाच्या गुणावगुणांचे सर्व गणित अवलंबून असते. शिवाय विशिष्ट रंग व वासासाठी चहाच्या मूळच्या नैसर्गिक पानांवर इतर रंग वगैरे टाकून संस्कार केले जातात. तसेच त्याच ठिकाणचा चहा प्यावा हे व्यसन लागावे या हेतूने चहात काही निषिद्ध वस्तू टाकल्या जातात. असा चहा नक्कीच चांगला नाही. याच्या उलट पहिल्या खुडणीचे, सिल्व्हर निडल वगैरे प्रकार खास ‘चाहत’ मंडळींसाठी मिळतात, त्याचा चहा हलका पण स्वादिष्ट होतो.

‘चाहत’ हा शब्द चहावरून तयार झालेला आहे असे वाटते. चहा घेण्याची चाहत तयार व्हायला हवी.

loading image