प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 5 April 2019

फॅमिली डॉक्‍टरच्या वाचकांच्या प्रश्नांना सविस्तर मार्गदर्शन करतात डॉ. श्री बालाजी तांबे.

माझे वय २२ वर्षे आहे. माझे केस खूप गळतात आणि त्याची वाढही खूप कमी आहे. अलीकडे माझे केस पांढरेसुद्धा होऊ लागले आहेत. कृपया मार्गदर्शन करावे.
- कु. वैभवी

उत्तर - केसांच्या तक्रारींवर बाहेरून तसेच आतून अशा दोन्ही प्रकारे उपचार करावे लागते. शरीरातील रसधातू, अस्थिधातू यांना पुरेसे पोषण मिळाले नाही तरी असा त्रास होऊ शकतो. यादृष्टीने रोज शतावरी कल्प, ‘सॅन रोझ’, धात्री रसायन यांसारखी रसायने सेवन करणे चांगले. केसांना आतून पोषण मिळावे यासाठी ‘हेअरसॅन’, प्रवाळपंचामृत या गोळ्या घेणे चांगले. आठवड्यातून २-३ वेळा केसांच्या मुळाशी केसांना हितकर द्रव्यांनी संस्कारित ‘संतुलन व्हिलेज हेअर सिद्ध तेल’ किंवा तेलामुळे केस चिकट व्हायला नको असतील, तर ‘संतुलन व्हिलेज हेअर क्रीम’ लावता येईल. केसांना प्रसाधनासाठी किंवा इतर कोणत्याही कारणास्तव रासायनिक द्रव्यांनी युक्‍त उत्पादने न वापरणे हे सुद्धा आवश्‍यक. केस धुण्यासाठी शिकेकाई, रिठा, आवळा, नागरमोथा वगैरेंचे मिश्रण किंवा तयार ‘सुकेशा’ हा हेअर वॉश वापरता येईल. कच्चे मीठ, किंवा पाणीपुरी, चिवडा, भेळ वगैरे कच्चे मीठ असणारे पदार्थ आहारातून टाळणे, सकस आहार घेणे हे सुद्धा आवश्‍यक. 

-------------------------------------------------------------------------------------------------------

मी निवृत्त प्राचार्य आहे. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून अनामिक भीती वाटते. नकारार्थी विचार येतात,  मन तणावग्रस्त होते, दिवसभर अस्वस्थता वाटते. पूर्वीचा उत्साह लोप पावला आहे. स्पाँडिलायटिस वगळता मोठा आजार नाही. यातून बाहेर पडण्याचा मार्ग सुचवावा.
- श्री. मनोहर म्हाडगुत
उत्तर -
प्राचार्यपदाची जबाबदारी निभावलेली आहे, तेव्हा मन सक्षम, समर्थ असणार यात संशय नाही. मात्र कदाचित निवृत्त झाल्यावर मनाला व्यासंग उरला नाही. असे होऊन चालणार नाही. कामाची जबाबदारी घ्यायची गरज नसली, तरी काही ना काही काम करत राहणे, मनाला सकारात्मक गोष्टींमध्ये व्यस्त ठेवणे, कुठला तरी छंद जोपासणे आवश्‍यक होय. बरोबरीने ही अनामिक भीती नाहीशी व्हावी यासाठी काही दिवस ‘संतुलन ब्रह्मलीन घृत’ घेण्याचा उपयोग होईल. रोज अंगाला अभ्यंग करण्याचा, सकाळ-संध्याकाळ ‘संतुलन चैतन्य कल्प’ घालून दूध घेण्याचा उपयोग होईल. याशिवाय सकाळी लवकर उठणे, पोट व्यवस्थित साफ होण्याकडे लक्ष देणे, १० मिनिटे अनुलोम-विलोम करणे, शुद्ध प्रकारे म्हटलेला ॐकार ऐकणे व म्हणणे, अथर्वशीर्ष, नवग्रहस्तोत्र, रामरक्षा यांसारखी १-२ संस्कृत स्तोत्रे म्हणणे किंवा ऐकणे, रोज घरात धूप करणे या उपायांचाही उपयोग होईल. मनातील नकारात्मकता दूर व्हावी व उत्साह वाढावा यासाठी ‘सोम ध्यान’ म्हणजे संतुलन ॐ मेडिटेशन करणे हे सुद्धा उत्तम गुणकारी ठरताना दिसते.

-------------------------------------------------------------------------------------------------------

मी फॅमिली डॉक्‍टरचा नियमित वाचक आहे. मला आपल्या सल्ल्याचा चांगला उपयोग झालेला आहे. माझी मुलगी २० वर्षांची आहे. तिला सतत तोंड येण्याचा व चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचा त्रास आहे. डॉक्‍टरांनी रक्‍त अशुद्ध असल्याचे सांगितले आहे. कृपया उपाय सुचवावा.
- श्रीमती स्नेहल भिसे 

उत्तर - रक्‍तशुद्धीच्या बरोबरीने स्त्रीसंतुलनासाठी सुद्धा प्रयत्न करायला हवेत. ‘संतुलन शतानंत कल्प’ तसेच ‘सॅन रोझ’ किंवा धात्री रसायन नियमित घेण्याने या दोन्ही गोष्टी साध्य होतील. उष्णता कमी होण्यासाठी मुलीला गुलकंद घेण्याचा तसेच ‘संतुलन पित्तशांती’ गोळ्या घेण्याचा उपयोग होईल. आठवड्यातील १-२ वेळा पादाभ्यंग करण्याचाही फायदा होईल. पोट साफ होत नसेल तर झोपण्यापूर्वी ‘सॅनकूल चूर्ण’ किंवा कपभर कोमट पाण्यात दोन चमचे तूप मिसळून घेणे चांगले. आठवड्यातून २-३ वेळा चेहऱ्याला ‘सॅन पित्त फेस पॅक’ दुधात किंवा गुलाबजलात मिसळून लावण्याचा आणि स्नान करताना किंवा एरवी सुद्धा चेहरा धुण्यासाठी साबण किंवा फेस वॉशऐवजी रक्‍तशुद्धीकर द्रव्यांपासून बनविलेले ‘सॅन मसाज पावडर’सारखे उटणे व मसूर डाळीचे पीठ मिसळून तयार केलेले मिश्रण वापरणे श्रेयस्कर. 

-------------------------------------------------------------------------------------------------------

मी फॅमिली डॉक्‍टरचा नियमित वाचक आहे. मला यातील मार्गदर्शनाचा फार फायदा होतो, याबद्दल प्रथम आपल्यास धन्यवाद. माझा मुलगा १२ वर्षांचा असून तो झोपेत खूप दात खातो, त्याचा खूप आवाज येतो. काही जण म्हणतात की हा मानसिक आजार आहे. कृपया उपाय सुचवावा. 
- श्री. सुनील आढे.
उत्तर -
लहान मुलांमध्ये जेव्हा हा त्रास आढळतो तेव्हा तो सहसा पोटातील जंतांशी संबंधित असते. लहान मुलांना असेही अधूनमधून जंतांचे औषध देणे चांगले असते. या दृष्टीने त्याला तीन महिने विडंगारिष्ट देता येईल, दोन्ही जेवणांनंतर १-१ चमचा ‘बाल हर्बल सिरप’ देण्याचा उपयोग होईल. आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात कपिला म्हणून चूर्ण मिळते. एक अष्टमांश चमचा हे चूर्ण व पाव चमचा गूळ एकत्र करून तयार केलेले मिश्रण तीन दिवस सलग रात्री झोपण्यापूर्वी देण्यानेही सकाळी १-२ वेळा पातळ शौचाला होऊन जंत पडून जायला मदत मिळेल व हळूहळू हा त्रास थांबेल. दात खाण्याबरोबरीने मुलाला भीतिदायक स्वप्ने पडत असतील, तर काही दिवस ‘सॅन रिलॅक्‍स सिरप’ व ’निद्रासॅन गोळी’ देण्याचाही उपयोग होईल.

-------------------------------------------------------------------------------------------------------
स्तन्यनिर्मिती भरपूर व्हावी म्हणून गरोदरपणात काय काळजी घ्यावी? आहार व इतर माहिती द्यावी. 
- श्री. प्रद्युम्न
उत्तर -
गरोदर असताना रसधातूच्या पोषणाकडे नीट लक्ष दिले तर बाळंतपणानंतर स्तन्यनिर्मिती व्यवस्थित होते. त्यामुळे सुरवातीपासून शतावरी कल्प घेणे, मासानुमासी गोळ्या म्हणजे प्रत्येक महिन्याला जी विशेष औषधे घ्यायची असतात त्याची योजना करणे, शहाळ्याचे पाणी पिणे, सकाळी पंचामृत व रात्रभर भिजवलेले बदाम खाणे, रोज एखादे तरी फळ खाणे या गोष्टी स्तन्यनिर्मितीसाठी सहायक ठरतात. याशिवाय तिसऱ्या महिन्यापासून पुढे नियमितपणे स्तनांना ‘संतुलन सुहृद तेल’ लावण्याचाही स्तन्यपान सुरळीत होण्यासाठी उपयोग होत असतो. गर्भारपणात आहार, आचरण, मानसिकता कशी असावी याचे सविस्तर मार्गदर्शन सकाळ प्रकाशित ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ या पुस्तकातून मिळू शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor question answer