esakal | प्रश्नोत्तरे
sakal

बोलून बातमी शोधा

famildoctor-question-answer

'फॅमिली डॉक्‍टर’ मधील लेखांमधून खूप मार्गदर्शन होते. ‘प्रश्नोत्तर’ सदरातील उत्तरांनी अनेक शंकांचे निरसन होते व आरोग्य चांगले राहते.

प्रश्नोत्तरे

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com

मला दात व दाढांचा त्रास असल्याने दातांच्या डॉक्‍टरांकडे उपचार घेतल्यापासून तोंडात लाळ अधिक प्रमाणात येते, त्यामुळे झोप येत नाही. मधातून कामदुधा गोळ्यांचे चूर्ण लावून ठेवतो, पण त्यामुळे फारसा फरक पडत नाही. कृपया उपाय सुचवावा.
... वसंत शिरोळे

उत्तर : लाळेचे प्रमाण कमी करण्यासाठी काथाचे चूर्ण मधात मिसळून हिरड्यांवर लावून ठेवण्याचा अधिक चांगला उपयोग होईल. दिवसातून दोन वेळा ‘संतुलन योगदंती’ या दंतमंजनाचा वापर करण्याचा, (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) काही वेळासाठी योगदंतीचे चूर्ण हिरड्यांवर, गालाच्या आतल्या बाजूला लावून ठेवण्याचाही उपयोग होईल. सकाळी उठल्यावर इरिमेदादी तेल किंवा ‘संतुलन सुमुख सिद्ध तेल’ तोंडात आठ-दहा मिनिटांसाठी धरून ठेवण्यानेही लाळ सुटणे कमी होते असे दिसते. शक्‍य असल्यास जेवणांनंतर विड्याचे पान चावून चावून खाण्याचाही फायदा होईल. 

-------------------------------------------------

माझे वय २५ वर्षे आहे. लग्नाला दीड वर्ष झाले, आम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करतो आहोत. मात्र लग्नापासून मला वारंवार खाज, जळजळ हे त्रास सुरू झाले आहेत. ‘‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ पुस्तकात वाचून मी फेमिसॅन तेल वापरते आहे. मात्र अजूनही फारसा फरक पडलेला नाही. कृपया योग्य मार्गदर्शन करावे.
.... राधिका
उत्तर
: ‘फेमिसॅन तेल’ वापरणे चांगलेच आहे. बरोबरीने या प्रकारच्या त्रासावर खालून ‘संतुलन शक्‍ती धुपा’ची धुरी घेण्याचा अधिक चांगला फायदा होईल. पुनर्नवाघनवटी तसेच पुनर्नवासव घेता येईल, सकाळ-संध्याकाळ एक-एक चमचा ‘संतुलन प्रशांत चूर्ण’ घेण्याचाही फायदा होईल. काही दिवस यजमानांनाही हेच चूर्ण देता आले तर उभयतांना बरे वाटेल. आहारात गवार, कोबी, फ्लॉवर, ढोबळी मिरची, वांगे या गोष्टी टाळणे, जेवणांनंतर वाटीभर ताजे ताक जिऱ्याची पूड मिसळून पिणे हेसुद्धा चांगले. हा त्रास पूर्ण बरा झाला की मगच गर्भधारणेसाठी प्रयत्न करणे श्रेयस्कर. त्यासाठी उत्तरबस्ती, अशोकादी घृत घेण्यानेही उत्तम हातभार लागेल.

-------------------------------------------------

मला बऱ्याच वर्षांपासून व्हर्टिगोचा त्रास आहे. ॲलोपॅथाची औषधे घेऊनही पूर्ण बरे वाटत नाही. आयुर्वेदाच्या गोळ्या व तेल लावणे हेसुद्धा चालू आहे, पण सत्तर टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण येत नाही. व्हर्टिगोमुळे तोल जातो व त्यामुळे मनात भीती वाटते. तरी उपाय सुचवावा.
... प्रभाकर पंडित

उत्तर : मेंदूशी संबंधित कोणत्याही विकारावर प्रत्यक्ष तपासणी करून औषध घेणे अधिक श्रेयस्कर असते. अशा केसेसमध्ये ‘संतुलन ब्रह्मलीन घृत’ घेण्याचा, रात्री झोपण्यापूर्वी नाकात ‘नस्यसॅन घृता’चे किंवा घरी बनविलेल्या साजूक तुपाचे दोन-तीन थेंब टाकण्याचा फायदा होताना दिसतो. तेल लावणे चालू ठेवणे उत्तमच, विशेषतः पाठीच्या कण्याला व मानेला ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ लावण्याचा, तसेच नियमित पादाभ्यंग करण्याचा फायदा होईल. रोज सकाळी पंचामृत घेणे, भिजवलेले चार-पाच बदाम खाणे, सुवर्णसिद्ध जल पिणे हे सुद्धा मेंदूसाठी उत्तम असते.     

-------------------------------------------------

मला पचनाशी संबंधित जरा विचित्र त्रास आहे. शौचावाटे कफ पडतो, कुंथल्याशिवाय शौचाला होत नाही. बहुधा यामुळे मणक्‍यांवर ताण येत असावा. त्यामुळे दोन्ही पाय, दोन्ही टाचा, चवडे गार पडतात. आजवर अनेक उपचार केले, पण गुण नाही. कृपया सल्ला द्यावा.
.... बर्वे 
उत्तर :
शौचावाटे कफ पडणे किंवा चिकटपणा जाणवणे हे अशक्‍तपणाला कारण ठरणारे असते, त्यामुळे यावर योग्य उपचार व्हायला हवेत. काही दिवस जेवणात अर्धा-अर्धा चमचा लवणभास्कर चूर्ण भातात मिसळून घेण्याने हा त्रास बरा होतो आहे का, हे पाहणे चांगले. जेवणांनंतर चमचाभर ‘सॅनकूल चूर्ण’ घेण्याने तसेच ‘संतुलन अन्नयोग गोळ्या’ घेण्याने पचन सुधारून, अग्नीची ताकद वाढून या प्रकारचा त्रास कमी होण्यास मदत मिळेल. बरोबरीने पाठीच्या कण्याला ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ लावण्याचा तसेच योगराज गुग्गुळ, ‘संतुलन वातबल’ गोळ्या घेण्याचाही फायदा होईल. 

-------------------------------------------------

माझ्या आईला गेल्या वर्षापासून जिभेची आग होण्याचा त्रास होतो आहे. बरीच औषधे घेऊनही फरक पडत नाही, आईला दमा व उच्च रक्‍तदाबाचाही त्रास होतो आहे.
.... विजय राजगुरू

उत्तर : जीभ हा पचनसंस्थेचा आरसा असतो, त्यामुळे पोटातील उष्णता कमी झाल्याशिवाय जिभेची आग कमी होणार नाही. दमा, उच्चरक्‍तदाब यासाठी घेतलेल्या औषधांचा हा दुष्परिणाम तर नाही ना याची डॉक्‍टरांकडून शहानिशा करून घेणे चांगले. बरोबरीने ‘संतुलन पित्तशांती’, कामदुधा गोळ्या घेण्याचा तसेच रात्री झोपताना ‘सॅनकूल चूर्ण’ घेण्याचा उपयोग होईल. फेमिसॅन तेलाचा पिचू वापरण्याचा तसेच ‘संतुलन सुमुख तेल’ किंवा इरिमेदादी तेल आठ-दहा मिनिटांसाठी तोंडात धरून ठेवण्याचाही उपयोग होईल. आठ-दहा दिवसांतून एकदा दीड-दोन चमचे एरंडेल घेऊन पोट साफ करण्यानेही पोटातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तज्ज्ञ वैद्यांना दाखवून उच्चरक्‍तदाब व दमा यासाठी औषधे सुरू केली तर सध्या चालू असलेल्या औषधांची मात्रा  कमी होऊ शकेल.