प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com
Friday, 6 October 2017

मी ‘फॅमिली डॉक्‍टर’ची नियमित वाचक आहे. मला आपले सल्ले खूप आवडतात. माझे वय ४० वर्षे आहे. गेल्या वर्षापासून मला यूरिक ॲसिड वाढण्याचा त्रास आहे. त्यामुळे बोटे, घोटे दुखतात. डॉक्‍टरांच्या सल्ल्याने एक गोळी रोज घेते आहे. तसेच त्यांनी कोणत्याही प्रकारच्या डाळी, टोमॅटो, मटण, मासे खाण्यास मनाई केली आहे. कृपया यावर उपाय सुचवावा. मी रोज सकाळी गोमूत्र दोन चमचे पाण्यातून घेते. ते योग्य आहे काय?
... पाटील 

मी ‘फॅमिली डॉक्‍टर’ची नियमित वाचक आहे. मला आपले सल्ले खूप आवडतात. माझे वय ४० वर्षे आहे. गेल्या वर्षापासून मला यूरिक ॲसिड वाढण्याचा त्रास आहे. त्यामुळे बोटे, घोटे दुखतात. डॉक्‍टरांच्या सल्ल्याने एक गोळी रोज घेते आहे. तसेच त्यांनी कोणत्याही प्रकारच्या डाळी, टोमॅटो, मटण, मासे खाण्यास मनाई केली आहे. कृपया यावर उपाय सुचवावा. मी रोज सकाळी गोमूत्र दोन चमचे पाण्यातून घेते. ते योग्य आहे काय?
... पाटील 
उत्तर -
रोज गोमूत्र घेणे एकंदर आरोग्यासाठी चांगलेच असते. फक्‍त हे गोमूत्र निरोगी गाईचे व ताजे असावे, शिवाय सात वेळा सुती कापडातून गाळून घेऊन त्यात समभाग पाणी मिसळून मग घेणे आवश्‍यक आहे. टोमॅटो, मांसाहार आहारातून टाळणे चांगले. मुगाची डाळ घ्यायला हरकत नाही. याशिवाय कोबी, फ्लॉवर, गवार, वांगे, ढोबळी मिरची, वाटाणा, चवळी, वाल वगैरे कडधान्ये टाळणे, स्वयंपाक करण्यासाठी तेलाचा वापर कमीत कमी करणे, त्याऐवजी साजूक तूप वापरणे चांगले. यूरिक ॲसिड कमी करण्यासाठी रक्‍तातील उष्णता कमी करणे, तसेच वातदोष संतुलित ठेवणे गरजेचे असते. यादृष्टीने प्रवाळ पंचामृत, कामदुधा, ‘संतुलन पित्तशांती गोळ्या’ घेणे चांगले. बरोबरीने ‘संतुलन वातबल गोळ्या’, गोक्षुरादी गुग्गुळ घेण्याचाही उपयोग होईल. बोटांचे सांधे, घोटे वगैरे दुखतात, त्यावर ‘संतुलन शांती सिद्ध तेल’ लावण्याचा उपयोग होईल. या त्रासावर पंचकर्मातील विरेचन, बस्ती घेण्याचाही उत्तम उपयोग होताना दिसतो. 

आमचे संपूर्ण कुटुंब ‘फॅमिली डॉक्‍टर’मधील आपल्या मार्गदर्शनाचा उपयोग करून घेते. माझा मुलगा तेरा वर्षांचा आहे. तो बोबडे बोलतो. विशेषतः त्याला ‘र’आणि ‘ल’ या दोन वर्णांचा उच्चार जमत नाही. वय लक्षात घेता त्याला स्पीच थेरपी करून घ्यावी का? कृपया मार्गदर्शन करावे.  
... वैशाली
उत्तर -
स्पीच थेरपीचा उपयोग करून घेता येईल. बरोबरीने मुलाला गंडूष उपचार करण्याचा उपयोग होईल. यासाठी अर्धा चमचा ‘संतुलन सुमुख तेल’ नुसते किंवा पाण्याबरोबर मिसळून तोंडात आठ-दहा मिनिटांसाठी धरून ठेवता येईल. वेखंड, अक्कलकरा वगैरे वनस्पतींचे विशेष मिश्रण जिभेला चोळल्याने, तसेच ‘संतुलन योगदंती’ चूर्ण वापरून दात घासल्याने उच्चार स्पष्ट होण्यास, जिभेचा जडपणा कमी होण्यास मदत मिळते असा अनुभव आहे. ‘संतुलन ब्रह्मलीन घृत’ तसेच वैद्यांच्या सल्ल्याने ‘ब्रह्मसॅन’ गोळ्या घेण्याचाही उपयोग होईल. 
 

माझी मुलगी आठ वर्षांची असून तिचे वजन उंचीच्या मानाने कमी आहे. तिला बस, कार, जीप वगैरे वाहनातून प्रवास करणे अजिबात सहन होत नाही. शाळेच्या बसमधून प्रवास करतानाही तिचे पोट दुखते. कधी कधी उलटीसुद्धा होते. या समस्येवर उपाय सुचवावे. तसेच एकंदर प्रकृती सुधारण्यासाठी सुद्धा उपचार सुचवावेत.
... किशोर
उत्तर -
शरीरात कडकी किंवा उष्णता जास्ती असली तर बऱ्याचदा वजन वाढत नाही, शिवाय वाहन लागण्याचाही त्रास होतो. या दृष्टीने मुलीला रोज सकाळी पंचामृत, आहारात तीन-चार चमचे साजूक तूप, शतावरी कल्प, ‘संतुलन पित्तशांती’, प्रवाळ पंचामृत गोळ्या देण्याचा उपयोग होईल. प्रवास करण्यापूर्वी दूध, चहा, उसाचा रस, सरबत वगैरे पेयपदार्थ घेणे टाळावेत. त्याऐवजी मूठभर कोरड्या साळीच्या लाह्या चावून खाणे चांगले असते. घरी बनवलेली आवळ्याची सुपारी चघळण्याचाही उपयोग होतो. बस वा कारमध्ये सुद्धा पोटात अस्वस्थ वाटायला लागले तर थोड्या थोड्या साळीच्या लाह्या खाण्याचा उपयोग होतो. मनगटाच्या आतल्या बाजूला एका विशिष्ट बिंदूवर दाब देत राहण्यानेही गाडी लागण्याचा त्रास टाळता येतो. यासाठी मनगटाभोवती बांधण्याचा विशेष पट्टासुद्धा उपलब्ध असतो. याचा वापर करण्याचाही मुलीला फायदा होईल. गाडी लागण्याची प्रवृत्ती पूर्णपणे बरी होईलच असे नाही, पण हे उपचार केले तर प्रवासात त्रास होणे टाळता येते असा अनुभव आहे.

माझ्या मुलाला (वय १३ वर्षे) मांडीवर गळू झालेले आहे. यासाठी काय औषध द्यावे? आणि पुन्हा गळू होऊ नये यासाठी काय उपाय योजावेत? डॉक्‍टरांनी डेटॉलने साफ करून त्या ठिकाणी क्रीम लावायला दिले आहे.
... अवनी
उत्तर -
गळू येण्यामागे रक्‍तदोष हे मुख्य कारण असते. त्यामुळे सहसा एकदा गळू आले की पुन्हा पुन्हा गळू येत राहते. हे होऊ नये यासाठी रक्‍तशुद्धीकर, त्यातही पित्तशामक औषधांची योजना करणे आवश्‍यक असते. यासाठी ‘अनंत सॅन’, ‘संतुलन पित्तशांती’, कामदुधा, महामंजिष्ठादी काढा, ‘संतुलन मंजिसार आसव’ ही औषधे घेता येतील. सध्या जे गळू झाले आहे त्यावर डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार साफ करून क्रीम लावणे चांगले. मात्र जखम भरून आली की त्यावर ‘संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल’ लावत राहिल्यास त्वचा पूर्ववत होण्यास व कोणताही डाग न राहण्यास मदत मिळते. रक्‍तदोष तयार होऊ नये यासाठी ढोबळी मिरची, वांगे, मोहरी, कुळीथ, दही, अननस, चिंच, टोमॅटो, आंबवलेले पदार्थ आहारातून टाळणे श्रेयस्कर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor question answer