रुग्णाला कसे व केव्हा भेटाल?

ज्योती देव
Friday, 1 June 2018

दवाखान्यातील रुग्णांना भेटायला केव्हा जावे, तसेच रुग्णास खाण्यास काय न्यावे, काय नेऊ हे पथ्य सर्वांनी पाळणे आवश्‍यक आहे. यासाठी काय काळजी घ्यायची हे लक्षात घेतले पाहिजे.

दवाखान्यातील रुग्णांना भेटायला केव्हा जावे, तसेच रुग्णास खाण्यास काय न्यावे, काय नेऊ हे पथ्य सर्वांनी पाळणे आवश्‍यक आहे. यासाठी काय काळजी घ्यायची हे लक्षात घेतले पाहिजे.

दवाखान्याच्या दिलेल्या वेळेनुसार भेटावयास जावे. 
कोणत्याही कार्यक्रमाहून उदा. लग्न, मुंज, इ ठिकाणाहून एकदम नट्टापट्टा केलेले असताना जाऊ नये. रुग्णाच्या मनाचा विचार करावा.
आपले बोलणे गोड असावे. चेहरा गंभीर करून आत जाऊ नये. रुग्णाचे बोलणे ऐकावे.
नकारात्मक बोलू नये. आता लवकरच घरी याल तेव्हा भेटू असे म्हणावे.
शक्‍य असेल डोक्‍यावरून हात फिरवावा किंवा हात हातात घ्यावा. स्पर्शाने बरे वाटते.
एकाच वेळी खूप जण भेटायला आले असतील तर आपण बाहेर पडावे. रुग्णाजवळ गर्दी करू नये.
आपल्याला वेळ असेल तेव्हा रुग्णापाशी दोन तास रिलीवर म्हणून बसावयास जावे.
आत गेल्यावर तेथील स्क्रीनकडे बघून अरे बापरे! असे कसे! असे शब्द वापरू नये. आपल्याला काही शंका असल्यास बाहेर येऊन रुग्णालयाच्या परिचारिकाशी बोलावे. 
खोलीच्या बाहेर बरेच जण भेटले तरी तेथे बसून गप्पा मारू नये. 

खाण्याच्या पदार्थांविषयी
शक्‍यतो विचारूनच रुग्णासाठी खायचे पदार्थ न्यावेत 
विशेषतः फळांमध्ये द्राक्षे, संत्री, अननस, मोसंबी, नेऊ नये. कारण त्यात आंबटपणा असतो. विचारूनच पपई, चिकू, सफरचंद न्यावीत. त्याचप्रमाणे बिस्कीट, शहाळेही विचारूनच न्यावीत.
फुलांचा गुच्छ (बुके) नेऊ नये कारण त्यात किडे किंवा मुंग्या असू शकतात. तसेच कधी कधी फुलांचा वाससुद्धा नको वाटतो. त्याचप्रमाणे उदबत्त्याही नेऊ नयेत.
घरात तयार केलेली कोरडी पिठे उदा. इडली, डोसा, भाजणी बरोबर न्यावीत. रुग्णाच्या घरातील लोक जेव्हा गरज असेल तेव्हा घरी बनवून आणून देतील.
परवानगी असल्यास नाश्‍ता अथवा सूप घरून द्यावे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jyoti Dev article How and when to meet the patient