कोजागरी 

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 11 October 2019

शरद ऋतूत दिवसा सूर्याची तीव्रता जाणवत असली, तरी रात्री तितक्‍याच शीतलतेने परिपूर्ण असतात. शिवाय, याच काळात ‘अगस्त्य’ नावाच्या ताऱ्याचा उदय होत असल्याने त्याच्या प्रभावामुळे पाणी विषरहित होते. शरदातील या विषरहित स्वच्छ व पवित्र पाण्याला ‘हंसोदक’ असे म्हटले जाते. हे पाणी पिणे, स्नानादी क्रियांसाठी वापरणे, या पाण्याने अवगाहन करणे हे अमृतोपम असते. अशा प्रकारे चंद्राची शीतलता आणि अगस्त्य ताऱ्याची निर्विषता ही शरद ऋतूमध्ये जणू वरदानाप्रमाणे असते. 
 

शरद ऋतूत दिवसा सूर्याची तीव्रता जाणवत असली, तरी रात्री तितक्‍याच शीतलतेने परिपूर्ण असतात. शिवाय, याच काळात ‘अगस्त्य’ नावाच्या ताऱ्याचा उदय होत असल्याने त्याच्या प्रभावामुळे पाणी विषरहित होते. शरदातील या विषरहित स्वच्छ व पवित्र पाण्याला ‘हंसोदक’ असे म्हटले जाते. हे पाणी पिणे, स्नानादी क्रियांसाठी वापरणे, या पाण्याने अवगाहन करणे हे अमृतोपम असते. अशा प्रकारे चंद्राची शीतलता आणि अगस्त्य ताऱ्याची निर्विषता ही शरद ऋतूमध्ये जणू वरदानाप्रमाणे असते. 
 
निसर्गाचा एक अविभाज्य घटक असल्याने आपल्यावर निसर्गातील प्रत्येक बदलाचा परिणाम होत असतो. हा बदल कधी आरोग्यासाठी अनुकूल असतो, तर कधी आरोग्यासाठी अवघड ठरणारा असतो. मात्र, अशा परिस्थितीत सहसा निसर्गातच उत्तर दडलेले असते. उदा. ग्रीष्म ऋतूत सूर्याची उष्णता वाढल्याने अंगाची काहिली होऊ लागते, शरीरातील रसभाव कमी होऊ लागतो. मात्र, यात ग्रीष्म ऋतूत आंबा, द्राक्षे, जाम, कलिंगड यासारखी रसरशीत फळेही निसर्ग देतो. असेच काहीसे शरद ऋतूतही घडते. शरद ऋतू येतो पावसाळ्याच्या अखेरीस. या काळात पावसाळ्यातील थंड वातावरण बदलून त्याऐवजी तीव्र सूर्यकिरणे तळपू लागली व हवेतील उष्णता वाढली की त्याचा परिणाम म्हणून शरीरात पित्तदोष भडकतो, आयुर्वेदात यालाच पित्तप्रकोप असे म्हटले जाते. 

 

मात्र, याच शरद ऋतूत दिवसा सूर्याची तीव्रता जाणवत असली तरी रात्री तितक्‍याच शीतलतेने परिपूर्ण असतात. शिवाय, याच काळात ‘अगस्त्य’ नावाच्या ताऱ्याचा उदय होत असल्याने त्याच्या प्रभावामुळे पाणी विषरहित होते. शरदातील या विषरहित स्वच्छ व पवित्र पाण्याला ‘हंसोदक’ असे म्हटले जाते. हे पाणी पिणे, स्नानादी क्रियांसाठी वापरणे, या पाण्याने अवगाहन करणे हे अमृतोपम असते. अशा प्रकारे चंद्राची शीतलता आणि अगस्त्य ताऱ्याची निर्विषता ही शरद ऋतूमध्ये जणू वरदानाप्रमाणे असते. 
 

आयुर्वेदातही शरद ऋतुचर्या सांगताना त्यात चंद्रकिरणांचा उपचारासाठी वापर करण्यास सांगितले आहे. 
शरत्काले प्रशस्यन्ते प्रदोषे च इन्दुरश्‍मयः । 
....चरक सूत्रस्थान 
शरद ऋतूत प्रदोषकाळात म्हणजे आकाशात ग्रह-तारे दिसू लागेपर्यंतच्या काळात चंद्रकिरणांचे सेवन करावे, म्हणजेच अंगावर चांदणे घ्यावे. 
ससितं माहिषं क्षीरं चन्द्रनक्षत्रशीतलम्‌ । 
....अष्टांगहृदय सूत्रस्थान 
रात्री चंद्राच्या चांदण्यात ठेवून थंड झालेले म्हशीचे दूध खडीसाखरेसह प्यावे. 
लघुशुद्धाम्बरस्रग्वी शीतोशीरविलेपनः । 
सेवेत चन्द्रकिरणान्‌ प्रदोषे सौधमाश्रितः ।। 

....अष्टांगहृदय सूत्रस्थान 
पातळ, स्वच्छ कपडे घालून; सुगंधी फुलांच्या माळा, गजरे घालून, शरीरावर वाळ्याची उटी लावून रात्रीच्या पहिल्या भागात चंद्रप्रकाशात बसावे. 

 

चंद्रशक्‍तीचा संबंध सर्व प्रकारच्या वनस्पतींशी असतो. वनस्पतींना संस्कृत भाषेत ‘ओषधि’ असे म्हटले जाते. 
ओषधयः संवदन्ते सोमेन सह राज्ञा । 
....ऋग्वेद 
ओषधि सोम म्हणजेच चंद्राला त्यांचा राजा म्हणून संबोधतात. 
औषध अधिकाधिक वीर्यवान व्हावे, सर्व शक्‍तीने परिपूर्ण व्हावे यासाठी जेव्हा वातावरणात चंद्रशक्‍तीचा प्रभाव सर्वाधिक आहे, तेव्हा वनस्पतींचे ग्रहण करण्याची, औषध तयार करण्याची पद्धत असते. म्हणजेच ज्या नक्षत्रांचा स्वामी चंद्र आहे अशा पुष्य, रोहिणी, मृगशिरा, हस्त वगैरे नक्षत्रांवर वनस्पती तोडणे, औषध सुरू करणे अधिक प्रशस्त समजले जाते. 

 

चंद्राच्या कलेवर समुद्राच्या भरती- ओहोटीचे गणित बसवता येते हे आपण जाणतो. समुद्र म्हणजे पाण्याचा साठा किंवा पृथ्वीवरचे सर्वाधिक जलतत्त्व. हेच जलतत्त्व आपल्या शरीरातही असते आणि त्यावरही चंद्राचाच प्रभाव असतो. स्त्रियांच्या बाबतीत हा संबंध अधिक स्पष्टपणे दिसतो, कारण रसधातूचा उपधातू म्हणजे रजस्राव आणि तो चंद्राच्या कलेप्रमाणे दर २८ दिवसांनी पाळीच्या रूपाने स्रवत असतो. स्त्रियांच्या अंगावरून पाणी जाणे, पांढरे जाणे यालाही आयुर्वेदात सोमरोग असे म्हटलेले आहे. कारण यामध्ये स्त्रीशरीरातील शरीरावश्‍यक धातू, शक्‍ती यांचा ऱ्हास होत असतो. स्त्रीला स्वतःलाही असा त्रास होत असला तर कमालीचा थकवा जाणवणे, गळून गेल्यासारखे वाटणे, काही करावेसे न वाटणे, कंबरदुखी वगैरे लक्षणे जाणवतात. 
भारतीय उत्सव, परंपरा आणि आरोग्य यांचा कायम संबंध असतोच. शरद ऋतूतील पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा; या दिवशी खारीक, बदाम, खसखस, साखर वगैरे पौष्टिक द्रव्यांबरोबर उकळवलेले दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवून, चांदण्यात बसून पिण्याची प्रथा आहे. हा पित्तशमनाचा एक उत्तम उपाय आहे.

आयुर्वेदाने फक्‍त शरद पौर्णिमेलाच नाही, तर संपूर्ण शरद ऋतूत चांदीच्या भांड्यात दूध ठेवून सकाळी ते सेवन करायला सांगितले आहे. दूध मुळात शीत स्वभावाचे असते, चंद्राची शीतलताही सर्वांच्या अनुभवाची असते, चांदीसुद्धा शीतल करणारी असते. तेव्हा या तिघांचा संयोग पित्तसंतुलनासाठी श्रेष्ठ ठरणारच. 
 

शरद ऋतूत दूध, घरचे लोणी-साखर, साजूक तूप या गोष्टी अमृतोपम होत, कारण हे सर्व पित्तशमनासाठी उत्तम असतात. मुगाचे लाडू, नारळाची वडी, गोड भात, उकडीचे मोदक, दुधी हलवा, कोहळेपाक हे गोड पदार्थही शरदामध्ये सेवन करण्यास योग्य असतात. कारले, कडवे वाल, मेथीची भाजी या चवीला कडवट असणाऱ्या भाज्याही अधूनमधून खाणे चांगले असते. साळीच्या लाह्या, मनुका, अंजीर, खडीसाखर हे पदार्थ सेवन करणे, फळांमध्ये शहाळ्याचे पाणी, नारळाचे दूध, आवळा, डाळिंब, सफरचंद, केळे, ऊस यांना अधिक प्राधान्य देणे; मोरावळा, गुलकंद, दाडिमावलेह सेवन करणेही शरद ऋतूत पथ्यकर असते. 
उकळून गार (सामान्य तापमानाचे) केलेले पाणी पिणे, पाणी उकळताना त्यात चंदन, वाळा, अनंतमूळ वगैरे शीतल द्रव्ये टाकणे हेसुद्धा या ऋतूत पित्तसंतुलनास मदत करते. 
भाज्यांमध्ये दुधी, तोंडली, घोसाळी, दोडकी, भेंडी, कोहळा, पडवळ, परवर, चाकवत, पालक अशा पचायला हलक्‍या व शीतल स्वभावाच्या भाज्या निवडणे; भाज्या करताना जिरे, हळद, धणे, कोकम, मेथ्या, तमालपत्र वगैरे मसाल्याचे पदार्थ वापरणे, हिरव्या मिरचीच्याऐवजी शक्‍यतो लाल मिरची, आले वापरणे हेसुद्धा शरदात पित्त वाढू नये म्हणून मदत करणारे असते. 

 

शरदामध्ये पित्ताचा प्रकोप होतो हे आपण सुरवातीला पाहिले. कोणत्याही दोषाचा प्रकोप होतो तेव्हा तो दोष वाढलेला तर असतोच; पण स्वतःच्या स्थानातून बाहेर पडलेला असतो. म्हणूनच या अवस्थेत त्याला बाहेर काढून टाकणे सहज शक्‍य असते. म्हणूनच शरद ऋतूमध्ये विरेचन करून प्रकुपित पित्तदोष शरीराबाहेर काढून टाकला तर पुढे वर्षभर पित्तासंबंधी कोणताही विकार होण्यास प्रतिबंध करता येऊ शकतो. अर्थात, विरेचन म्हणजे नुसते जुलाबाचे औषध घेणे नव्हे, तर शास्त्रोक्‍त पद्धतीने स्वेदन, स्नेहन वगैरे सर्व पूर्वतयारी करून पित्तदोष लहान आतड्यापर्यंत आणून विरेचनाद्वारा शरीराबाहेर काढून टाकणे हे खरे विरेचन होय. प्रत्येक शरदात जर असे शास्त्रोक्‍त विरेचन करून घेतले तर पचन नीट राहणे, वजन नियंत्रणात राहणे, पर्यायाने कोलेस्टेरॉल, रक्‍तदाब, मधुमेह, हृद्‍रोग वगैरे सर्वच अवघड रोगांना प्रतिबंध करणे शक्‍य असते. 
 

शरदामध्ये पित्ताचा त्रास होऊ नये यासाठी नियमित पादाभ्यंग करणेसुद्धा अतिशय उपयुक्‍त असते. शतावरी कल्प, अविपत्तिकर चूर्ण, पित्तशांती गोळ्या वगैरे पित्तशामक रसायने, औषधे या ऋतूत घेणे; जागरणे, उन्हात जाणे टाळणे; धूम्रपान, मद्यपान, मांसाहार वर्ज्य करणे यासारखी काळजी घेतली तर शरदात पित्ताचा त्रास सहन करावा लागणार नाही, उलट शरदातील चांदण्याचा आनंद घेता येईल.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kojagaree article written by Dr Shree Balaji Tambe