तर काय? : प्रश्नोत्तरे

आम्ही औरंगाबादला राहतो. सध्या येथे खूपच तीव्र उन्हाळा आहे, मागच्या वर्षी पहिली लाट आली तेव्हापासून आम्ही पाणी उकळून घेऊन गरम पितो.
Tea
TeaSakal

आम्ही औरंगाबादला राहतो. सध्या येथे खूपच तीव्र उन्हाळा आहे, मागच्या वर्षी पहिली लाट आली तेव्हापासून आम्ही पाणी उकळून घेऊन गरम पितो. मात्र सध्याच्या उकाड्यात मुले गरम पाणी प्यायचा कंटाळा करतात, तर अगोदर उकळलेले पाणी नंतर थंड करून प्यायले तर चालेल का?

...सौ. सायली

उत्तर : उकळलेले पाणी थंड करून प्यायले तरी चालते, फक्त फ्रिजमधील थंडगार पाणी पिणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि सध्याच्या संसर्गजन्य परिस्थितीत चांगले नाही. प्यायचे पाणी फिल्टर करून नंतर वीस मिनिटांसाठी उकळायला ठेवावे, थोडे निवले की जाडसर सुती कापडातून गाळून घ्यावे व सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात सामान्य तापमानाचे झाले की माठात गार करून प्यावे. प्रतिकारशक्ती चांगली राहावी यादृष्टीने पाणी उकळताना त्यात २४ कॅरट शुद्ध सुवर्णाचे वेढणे किंवा बिस्कीट आणि २-३ चिमूट जलसंतुलन चूर्ण टाकणे अधिक चांगले.

आई-वडील, मी व माझी पत्नी व माझा भाऊ असे आमचे पाच जणांचे कुटुंब आहे. भाऊ वगळता आम्ही चौघे घरीच असतो. भावाला अधूनमधून कामानिमित्ताने घराबाहेर जावे लागते. सध्याच्या या परिस्थितीत भावाला किंवा आम्हाला संसर्ग होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला हवी?

.... श्री. विवेक कुलकर्णी

उत्तर : कामानिमित्त घराबाहेर पडणे अपरिहार्य असले तरी मास्क घालणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, इतरांपासून शक्य तितके दूर राहणे हे नियम पाळणे आवश्यक आहे. भाऊ बाहेरून घरी आला की सर्वप्रथम कपडे धुवायला टाकणे, स्नान करून, शक्य नसल्यास, कमीत कमी चेहरा व हात-पाय स्वच्छ धुऊन मगच घरातल्यांच्या संपर्कात येणे चांगले. घरातील सर्वांनी रोज एकदा सॅन अमृत हर्बल चहा घेणे, याशिवाय भावाने संतुलन फॉर्म्युला के२ पासून बनविलेला काढा घेणे चांगले. सर्वांनी सकाळी च्यवनप्राश सारखे रसायन, संशमनी वटी, दिवसातून दोन वेळा वाफारा घेणे उत्तम. आहारातून दही, पनीर, चीज, थंड पाणी, आइस्क्रीम, पावटा, चवळी, तळलेले पदार्थ, बेकरी उत्पादने वगैरे वात-कफकारक गोष्टी आहारातून टाळणे सुद्धा सर्वांसाठी चांगले.

आम्ही संतुलनची उत्पादने वापरतो व आम्हाला त्याचा चांगला फायदा झाला. मार्चपासून आम्ही सॅन अमृत चहा घेतो आहोत. संतुलन फॉर्म्युला के२ हा काढासुद्धा घ्यायला हवा का याविषयी माहिती द्यावी.

...श्री. रवी शिंदे

उत्तर : घरातील सर्वांनीच सॅन अमृत चहा रोज घेणे प्रतिकारशक्ती उत्तम ठेवण्यासाठी चांगले. दहा वर्षांखालील मुलांना अर्धा, मोठ्यांसाठी एक कप सॅन अमृत चहा उत्तम परिणाम देतो. सध्या संसर्ग होऊ नये यासाठी संतुलन फॉर्म्युला के२ काढा सुद्धा घेणे चांगले. यासाठी सपाट दोन चमचे फॉर्म्युला के२ चूर्ण दोन कप पाण्यात अर्धा कप होईपर्यंत उकळून गाळून घेता येतो. मात्र काही कारणामुळे बाहेर जावे लागले, घशात खवखव, सर्दी, खोकला, ताप वगैरे काही लक्षणे दिसू लागली, संपर्कातील व्यक्ती संसर्गग्रस्त झाल्याचे लक्षात आले, हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज पडली तर मात्र फॉर्म्युला के२ पासून बनविलेला काढा पूर्ण मात्रेमध्ये म्हणजे १० ग्रॅम चूर्ण चार कप पाण्यात एक कप होईपर्यंत उकळून गाळून घेणे आणि संध्याकाळी त्याच चूर्णात दोन कप पाणी घालून अर्धा कप होईपर्यंत उकळून तयार झालेला काढा पिणे चांगले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com