प्रश्नोत्तरे | question and answer | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Life
प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

मी श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांचे यूट्यूबवरील सर्व व्हिडिओ पाहतो. यातून खूप चांगली माहिती मिळते. दोन आठवड्यांपूर्वी ब्राह्मी चटणीचा जो व्हिडिओ होता तो खूप छान होता. माझा प्रश्र्न असा आहे, की पाच वर्षांच्या मुलीला ही चटणी दिली तर चालेल का ?

- श्री. विवेक फणसे

उत्तर : नक्की चालेल. ब्राह्मी ही लहान मुलांसाठी तर अतिशय उपयोगी वनस्पती असते. कमी तिखट घालून बनविलेली ब्राह्मी चटणी मुलीला देणे उत्तम. ब्राह्मी चटणीचा व्हिडिओ आवडल्याचे कळविल्याबद्दल आपले आभार.

मी २४ वर्षांची असून कॉम्प्युटर इंजिनिअर आहे. घरी तसेच ऑफिसमध्ये सतत काही ना काही ताण-तणावाचे प्रसंग येत राहतात. श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांचे संगीत ऐकले किंवा त्यांचे यू-ट्यूबवरचे व्हिडिओ पाहिले की मन शांत होण्यास मदत मिळते. कधीकधी विचारांच्या गोंधळात झोप लागत नसली तर काय करावे?

- कु. मानसी सावळे

उत्तर : श्रीगुरुजींच्या आवाजातील योगनिद्रा, स्पिरीट ऑफ हार्मनी यासारखे संगीत ऐकण्याने विचार शांत होण्यास मदत मिळते असा अनेकांचा अनुभव आहे. तसेच निद्रासॅन गोळ्या, सॅन रिलॅक्स सिरप घेण्यानेही शांत झोप लागण्यास मदत मिळेल. झोपण्यापूर्वी टाळूला संतुलनचे ब्रह्मलीन सिद्ध तेल लावण्यानेही ताण कमी होणे शक्य होईल. दालचिनी उगाळून तयार केलेले गंध अष्टमांश चमचा, जायफळाचे गंध पाव चमचा, चिमूटभर केशर आणि अर्धा चमचा किंवा चवीनुसार खडीसाखर हे मिश्रण थोडे थोडे घेण्याने ताण कमी होऊन बरे वाटण्यास व शांत झोप लागण्यास मदत मिळेल.

माझे वय ५५ वर्षे आहे. स्लिप डिस्कचा त्रास असल्याने माझा एक पाय खूप दुखतो, जास्त वेळ उभे राहता येत नाही, चालायलाही खूप त्रास होतो. ॲलोपॅथीच्या गोळ्या घेतल्याने पित्त खूप वाढते. यावर कृपया उपाय सुचवावा.

- श्री. संजय पाटोळे, सोलापूर

उत्तर : असे पाहण्यात येते की व्यवसायानमित्त प्रवास करण्याने, बराच वेळ एका ठिकाणी बसण्याने किंवा बराच वेळ उभे राहण्याने, चुकीच्या पोश्चरमुळे शरीरातील वात वाढून अशा प्रकारे दोन मणक्यातील गादी सरकते, त्यामुळे नसेवर दाब येतो व स्लिप डिस्कचा त्रास सुरू होतो. वात आटोक्यात येण्याकरता तसेच पाठदुखी कमी होण्याकरता कुंडलिनी सिद्ध तेलासारखे तेल रोज रात्री पाठीला लावावे. आठवड्यातून २-३ वेळा संतुलन अभ्यंग सिद्ध तेल पायाला खालून वर या दिशेत लावण्याचाही फायदा होऊ शकेल. खारकेची पूड टाकून उकळलेले एक कप दूध रोज घेणे चांगले. तूप-साखरेत मिसळून संतुलन प्रशांत चूर्ण घेण्याचा, तसेच संतुलन वातबल गोळ्या घेण्याचाही फायदा होऊ शकेल. तज्ज्ञ वैद्यांना प्रकृती दाखवून बाकीचेही उपचार सुरू करता येतील. संतुलन पंचकर्म करून घेतल्यास वात संतुलनासाठी उपयोगी असणारी एनिमा बस्ती घेण्याचा फायदा होऊ शकेल. तसेच नसांची ताकद वाढण्याच्या दृष्टीने पोटली या उपचाराचा फायदा होऊ शकेल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Family Doctor
loading image
go to top