प्रश्नोत्तरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रश्नोत्तरे

मी फॅमिली डॉक्टर, साम टीव्हीवरून श्री गुरुजींचे कायम मार्गदर्शन घेत असतो. पूर्वी एकदा त्यांनी भूक लागत नसली तर यकृताची कार्यक्षमता वाढविण्यासाठी कोरफडीचा एक उपाय सुचवला होता.

प्रश्नोत्तरे

मी फॅमिली डॉक्टर, साम टीव्हीवरून श्री गुरुजींचे कायम मार्गदर्शन घेत असतो. पूर्वी एकदा त्यांनी भूक लागत नसली तर यकृताची कार्यक्षमता वाढविण्यासाठी कोरफडीचा एक उपाय सुचवला होता. कृपया तो विस्ताराने सांगाल का?

- विकास पुरोहित (कोल्हापूर)

उत्तर - ताज्या कोरफडीचा एक चमचा गर सालीपासून वेगळा काढणे. छोट्या कढईत किंवा पळीमध्ये २-३ थेंब साजूक तूप घेऊन त्यावर हा गर मंद आचेवर १-२ मिनिटांसाठी परतून घेणे, जेणेकरून त्यातील चिकटपणा कमी होईल. मग त्यावर चिमूटभर हळद टाकून रोज सकाळी नाश्त्यापूर्वी सेवन करणे. यामुळे यकृताची कार्यक्षमता सुधारते, भूक लागायला लागते, एकंदर पचनक्रिया व्यवस्थित होण्यास मदत मिळते. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत कोणीही हा उपाय करू शकतो.

आम्हाला आयुर्वेदीय गर्भसंस्कार या पुस्तकाचा खूप फायदा झाला. माझी मुलगी चार वर्षांची आहे, तिची तब्येत, एकंदर विकास उत्तम आहे. इतके दिवस ती कधी आजारी पडली नाही, मात्र शाळेत जायला लागल्यापासून तिला २-३ वेळा सर्दी-खोकला झाला. आम्ही तिला फक्त संतुलनचे सीतोपलादि चूर्ण दिले. पण याशिवाय काय उपचार करता येतील? कृपया मार्गदर्शन करावे.

- स्नेहा परदेशी ( नवी मुंबई )

उत्तर - संतुलनचे सीतोपलादि चूर्ण देणे उत्तम आहेच. बरोबरीने ब्राँकोसॅन सिरप सुद्धा सकाळ-संध्याकाळ अर्धा अर्धा चमचा देण्याचा उपयोग होईल. मुलीला रोज सकाळी अर्धा चमचा च्यवनप्राश देण्याने तसेच चैतन्य कल्प घालून दूध दिल्याने प्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत मिळेल. सहजासहजी संसर्ग होऊ नये यासाठी घरात सकाळ-संध्याकाळ धूप करण्याचा, विशेषतः संतुलन प्युरिफायर, सुरक्षा वगैरे, खूप उपयोग होतो. घरात लहान मुले असणाऱ्यांनी तर हे आवर्जून करावे. मुलगी पाच-साडेपाच वर्षांची होईपर्यंत तिला संतुलन बालामृत हे प्रतिकारशक्तीवर्धक सुवर्णरसायन देणेही उत्तम.