प्रश्नोत्तरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health
प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

माझे वय १९ आहे. १७व्या वर्षी पाळी सुरू झाली, पण दर महिन्याला पाळी येत नाही, तसेच माझे वजनही वाढत चाललेले आहे. पाळीच्या वेळी पोट दुखते, तसेच रक्तस्राव जास्त होतो. तरी काय करता येईल ?

- कु. नताशा, पुणे

उत्तर - हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे पाळीबद्दल वेगवेगळे विकार होताना दिसतात. साधारणपण १३-१४व्या वर्षी पाळी सुरू होऊन दर महिन्याला पाळी येणे, पाळीच्या वेळी कुठलाही त्रास न होता तीन दिवस रक्तस्राव होणे अपेक्षित असते. तसे होत नसल्यास शरीरातील हॉर्मोन्स असंतुलित असल्याचे निदान करावे लागते. अशोक- ॲलो सॅन गोळ्या, संतुलन फेमिनाइन बॅलन्स हे आसव, सॅन रोझ व स्त्री संतुलन कल्प ही रसायने घेण्याचा तसेच फेमिसॅन सिद्ध तेलाचा पिचू ठेवण्याचा उपयोग होताना दिसेल. पोट दुखत असताना पोटावर संतुलन रोझ ब्युटी तेलाचा हलक्या हाताने मसाज केल्यास वेदना कमी होण्यास मदत मिळू शकते. पाळीच्या विकारांकडे मुळीच दुर्लक्ष करू नये, कारण स्त्रीच्या प्रजननसंस्थेवरच तिच्या स्वास्थ्याचा पाया असतो. त्यामुळे लवकरात लवकर तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रकृतीनुसार औषधोपचार घेणे सुरू करणे, तसेच पंचकर्म उपचार करवून घेणे श्रेयस्कर ठरेल.

वातप्रकृती असल्यास सांध्यांचा त्रास नक्की होतो असे ऐकण्यात येते. हे खरे आहे का व वातप्रकृती असल्यास स्वतःची काळजी कशी घ्यावी?

- महेश कुलकर्णी, बारामती

उत्तर : शरीरातील हलनचलनासाठी वातदोष जबाबदार असतो. शरीरातील सांधे हे वातदोषाचे एक स्थान होय. वातदोष शरीरात कोरडेपणा आणण्यासही जबाबदार असतो. त्यामुळे वातप्रकृती असताना वात वाढणाऱ्या गोष्टी केल्या गेल्या तर सांधेदुखीचा त्रास होण्याची शक्यता असते. इतर प्रकृतींमध्येही असा त्रास होऊ शकतो. वातदोष आटोक्यात ठेवण्यासाठी स्निग्धता आवश्यक असते, त्यामुळे शरीराला कोमट योग्य प्रकारे सिद्ध केलेले तेल लावणे, आहारातून वातूळ पदार्थ वर्ज्य करणे, कोरड्या पदार्थांचे सेवन टाळणे, पिण्याचे पाणी कोमट असणे श्रेयस्कर ठरेल. पंख्याखाली बसणे, एसीच्या झोतात बसणे वातप्रकृतीच्या व्यक्तींनी टाळणे बरे. साजूक तूप, लोणी, डिंकाचे लाडू, वेगवेगळ्या प्रकारच्या खिरी यांचा आहारात समावेश करावा. रात्री उशिरापर्यंत जागरण करणे टाळावे. मॅरोसॅन व आत्मप्राशसारखे रसायन नक्की घ्यावे, जेणेकरून ताकद वाढायला मदत मिळेल. घरात वातदोषाची वा संधिवाताची आनुवंशिकता असली तर संतुलन पंचकर्म करून घेतल्याचा चांगला फायदा होताना दिसतो. व्यवस्थित काळजी घेतल्यास प्रकृतीत असलेले दोष, त्रास कमी करण्यात किंवा हटवण्यास मदत मिळू शकते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Family Doctor
loading image
go to top