
काही वर्षांपासून मला थोडेही तिखट खाल्ले तर त्रास होतो. त्रास म्हणजे पोटात जळजळते, शौचाला आग होते, कधी कधी तोंडही येते.
प्रश्नोत्तरे
प्रश्न - काही वर्षांपासून मला थोडेही तिखट खाल्ले तर त्रास होतो. त्रास म्हणजे पोटात जळजळते, शौचाला आग होते, कधी कधी तोंडही येते. पण तिखट न खाण्याचा इतर काही त्रास होऊ शकतो का? माझे वय ५० वर्षे आहे.
- राहुल देशमाने
षड्रसांपैकी तिखट हा एक रस. आहार षड्रसपूर्ण असावा असे आयुर्वेदशास्त्र सांगते. शरीरातील कफदोष कमी व्हावा, पचन सुधारावे यासाठी योग्य प्रमाणात तिखट चवीच्या गोष्टी सेवन करणे गरजेचे असते. मात्र तिखट म्हणजे मिरची असा याठिकाणी अर्थ घेऊन चालणार नाही. आले, लसूण, मिरी वगैरे गोष्टीसुद्धा तिखट चवीच्या असतात. तसेच हिरव्या मिरचीपेक्षा लाल मिरची कमी तीक्ष्ण असते.त्यामुळे सुरुवातीला फक्त आले, त्यानंतर क्रमाक्रमाने मिरी, लसूण, लाल मिरची वगैरे तिखट द्रव्यांचा आहारात समावेश करणे चांगले. तिखट गोष्टींचा त्रास होऊ नये यासाठी कामदुधा, संतुलन पित्तशांती, सॅनकूल चूर्ण घेण्याचाही उत्तम उपयोग होतो.
प्रश्न - माझी मुलगी २० वर्षांची आहे. तिला पाळी ८-१० दिवस उशिरा येते, पण मुख्य म्हणजे पोट दुखण्याचा खूप त्रास होतो. पहिले दोन दिवस तर घराबाहेरही पडवत नाही. कृपया यावर काही उपाय सुचवावा.
- धनश्री पाटील
उशिरा पाळी व पोट दुखणे ही दोन्ही लक्षणे वातवृद्धीशी निगडित आहेत. वातसंतुलनासाठी उत्तम उपाय म्हणजे तेल. तेव्हा फेमिसॅन तेलाचा पिचू नियमित वापरणे आणि पोट जेथे दुखते तेथे पूर्ण महिनाभर संतुलन रोझ ब्यूटी सिद्ध तेल जिरवणे हे दोन उपाय उत्तम. पाळी नियमित येण्यासाठी अशोक, कोरफड या द्रव्यांचा उत्तम उपयोग होतो. त्यादृष्टीने रोज सकाळी एक चमचाभर कोरफडीचा ताजा गर घेणे आणि जेवणानंतर संतुलन फेमिनाइन बॅलन्स आसव घेणे, सकाळ- संध्याकाळ अशोक-ॲलो सॅन गोळ्या घेणे सुद्धा चांगले. नियमित चालायला जाणे, सूर्यनमस्कार करणे स्त्री संतुलन संगीत ऐकणे हेसुद्धा श्रेयस्कर.
Web Title: Question And Answer 15th July 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..