प्रश्नोत्तरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health

माझे वय २६ वर्षे आहे. वजन फार कमी असल्याने माझे लग्न ठरायला अडचण येते आहे.

प्रश्नोत्तरे

माझे वय २६ वर्षे आहे. वजन फार कमी असल्याने माझे लग्न ठरायला अडचण येते आहे. माझ्या घरचे लोक फार काळजीत आहेत. वजन वाढण्यासाठी काही उपाय करता येईल का ?

- सोनाली गीते, नगर

उत्तर - वजन प्रकृती व वय यांवर ठरत असते. सहसा लग्न होऊन मुले-बाळे झाल्यावर स्त्रियांचे वजन वाढताना दिसते. पण प्रकृती वाताची असल्यास वजन वाढणे सोपे नसते. वजन वाढण्याकरता खाण्या-पिण्याची काळजी घ्यावी. आहारात धातुपोषक पदार्थ असावेत. उपचार करण्याची गरज असते. रोज नियमाने संतुलन अमृतशर्करा घालून पंचामृत, संतुलन धात्री रसायन, मॅरोसॅनसारखे रसायन घेण्याचा फायदा होऊ शकेल. घरी केलेला डिंकाचा लाडू, शिंगाड्याची खीर, यांचा आहारात समावेश असावा. रोज स्त्री संतुलन कल्प किंवा संतुलन चैतन्य कल्प घालून दूध घ्यावे. यातच २ चमचे तूप घातल्यासही फायदा होऊ शकतो. वजन वाढण्यासाठी शरीरातील वात कमी होण्यासाठी स्नानापूर्वी संपूर्ण शरीराला संतुलन अभ्यंग सेसमी तेलासारख्या वातशामक तेलाचा मसाज घ्यावा. पत्रावरून आपली पाळी व्यवस्थित चालू आहे किंवा नाही हे कळू शकलेले नाही. पण स्त्रीची पाळी व्यवस्थित असणे एकूण आरोग्याच्या दृष्टीने चांगले. पाळीबद्दल काही तक्रार असल्यास संतुलनचे फेमिनाईन बॅलन्स आसव व संतुलन फेमिसॅन तेलाचा पिचू वापरण्याचा उपयोग होऊ शकेल.

माझ्या घराण्यामध्ये हृदयरोगाचा व मधुमेहाचा इतिहास आहे. माझे वय ४० वर्षे आहे. मला सध्या श्र्वास घ्यायला त्रास, अकारण थकवा अशी लक्षणे जाणवत आहेत. मी वारंवार रक्तदाब तपासला पाहिजे असे डॉक्टर म्हणतात. आता पंचकर्म करण्याने मला फायदा होईल का, की रक्तदाबाचा त्रास सुरू झाल्यानंतरच पंचकर्म करावे? कृपया मार्गदर्शन करावे.

- श्री. प्रमोद जावळे, नागपूर

उत्तर - शास्त्रोक्त पद्धतीने केले जाणारे संतुलन पंचकर्म प्रतिबंधात्मक म्हणजे आजार होण्यापासून संरक्षण मिळण्याकरताही अतिशय उपयोगी असते. आजार झाल्यावर पंचकर्म करण्यापेक्षा आजार होण्यापूर्वीच पंचकर्माद्वारे शरीराची शुद्धी करून घेतल्यास अधिक फायदा होताना दिसतो. सध्या आपली जीवनशैली मोठ्या प्रमाणावर बदललेली आहे, खाण्या-पिण्याच्या वेळा बदललेल्या आहेत, ताण-तणाव वाढलेला आहे. एकूण आरोग्याच्या दृष्टीने अनेक चुकीच्या गोष्टींना आपण रोज सामोरे जात असतो. त्यामुळे खरे तर प्रत्येकाने चाळिशीच्या सुमाराला संतुलनचे शास्त्रोक्त पंचकर्म करवून घेऊन शरीरशुद्धी करवून घेणे अत्यंत श्रेयस्कर ठरते. त्यानंतरही निरोगी व्यक्तीने ३ ते ५ वर्षांत एकदा पंचकर्म करवून घेणे उत्तम. आजार झाल्यास दर दोन वर्षांनी किंवा प्रत्येक वर्षीही असे पंचकर्म करता येते. आपणही तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेऊन संतुलन पंचकर्मासारखे शास्त्रोक्त पंचकर्म करवून घ्यावे, त्याचा उपयोग होईल.

Web Title: Question And Answer 19th August 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Family Doctorhealth