
आमचे लग्न चार वर्षांपूर्वी झाले, पण अजूनही पत्नीला दिवस राहिलेले नाहीत. वैद्यकीय तपासण्यांमध्ये माझा स्पर्म काउंट कमी असल्याचे समजले आहे.
प्रश्नोत्तरे
आमचे लग्न चार वर्षांपूर्वी झाले, पण अजूनही पत्नीला दिवस राहिलेले नाहीत. वैद्यकीय तपासण्यांमध्ये माझा स्पर्म काउंट कमी असल्याचे समजले आहे. आयुर्वेदिक औषधांनी हा काउंट वाढू शकतो का? कृपया मार्गदर्शन करावे.
श्री. अतुल देशमाने
उत्तर - आयुर्वेदिक उपचारांनी या समस्येवर उत्तम परिणाम मिळू शकतात. यासाठी वैद्याच्या मार्गदर्शनाने औषध घेणे सर्वांत चांगले. तत्पूर्वी संतुलन प्रशांत चूर्ण तूपसाखरेसह घेणे, चैतन्य कल्प घालून दूध घेणे, रोज सकाळी अमृशर्करासह पंचामृत, रात्रभर भिजवलेले ३-४ बदाम घेणे हे उपाय सुरू करता येतील. मानसिक ताण कमी होण्यासाठी योगासने, ध्यानाचा अंतर्भाव करणे, पौष्टिक पण पचायला सोपा असा आहार उदा. साजूक तूप, घरचे लोणी-साखर, काळ्या मनुका, वेलीवरच्या फळभाज्या, खडीसाखर, पचायला सोपी कडधान्ये, तांदूळ, गहू-ज्वारी अशी धान्ये यांचा आहारात समावेश.
माझे वय ३० वर्षे आहे. मला वारंवार डोके दुखण्याचा त्रास होतो. कधी तरी उलटी होते. उलटी झाली तर बरे वाटते, नाही तर रात्रभर डोके दुखते, झोप येत नाही. आजकाल वेदनाशामक गोळ्या घेऊनही डोके दुखायचे थांबत नाही. कृपया यावर काही उपाय सुचवावा.
सौ. स्नेहा काळे
उत्तर - ही सर्व लक्षणे शरीरात उष्णता अधिक असल्याची आहेत. पोटातील उष्णता रोजच्या रोज निघून जाण्यासाठी झोपण्यापूर्वी सॅनकूल चूर्ण घेणे चांगले. १०-१५ दिवसातून एकदा दोन चमचे एरंडेल तेल घेणेसुद्धा चांगले. आठवड्यातून २-३ दिवस पादाभ्यंग करण्यानेसुद्धा शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते. सकाळ-संध्याकाळ संतुलन पित्तशांती तसेच कामदुधा गोळ्या घेणे, डोके दुखते त्या भागावर तसेच पोटावर झोपण्यापूर्वी रोज संतुलन रोझ ब्यूटी सिद्ध तेल लावणे हे हितावह. दुपारचे जेवण १२ ते १ या वेळेत आणि रात्रीचे जेवण सूर्यास्तानंतर लवकरात लवकर करणे, रात्री ११च्या आत झोपणे, किमान ७ तासांची पुरेशी झोप घेणे, आहारात किमान ४-५ चमचे घरी बनविलेले साजूक तूप समाविष्ट करणे हेसुद्धा चांगले. या उपायांनी बरे वाटेलच, तरीही त्रासाची तीव्रता लक्षात घेता एकदा तज्ज्ञ वैद्यांचे मार्गदर्शन घेणे श्रेयस्कर.
Web Title: Question And Answer 1st July 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..