esakal | प्रश्नोत्तरे
sakal

बोलून बातमी शोधा

Erand Oil

प्रश्नोत्तरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

माझे वय २७ वर्षे असून सध्या माझा पाचवा महिना चालू आहे. मी संतुलनचे गर्भसंस्कार संगीत रोज ऐकते, त्याने खूप छान वाटते. प्रतिकारशक्ती चांगली राहावी, मध्येच तब्येती संबंधी समस्या उत्पन्न होऊ नये यासाठी काय करावे?

...सौ. प्रणिता रबडे

उत्तर - गर्भारपणात स्त्रीचे स्वतःचे आणि गर्भाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी गर्भसंस्कार करायचे असतात. संगीत रोज ऐकता आहात हे उत्तम आहेच. बरोबरीने रक्तवृद्धी व रक्तशुद्धीसाठी संतुलन लोहित प्लस गोळ्या, नैसर्गिक कॅल्शियमसाठी कॅल्सिसॅन गोळ्या, एकंदर शक्ती, उत्साह, कांतीसाठी सॅनरोझ सारखे रसायन घेण्याने स्त्रीची तब्येत उत्तम राहते, गर्भाचाही विकास व्यवस्थित होतो असा अनुभव आहे. शिवाय ही औषधे पूर्णतः नैसर्गिक असल्याने त्यांचे कोणतेही दुष्परिणाम नसतात. अंगाला नियमित अभ्यंग, पाठीच्या कण्याला कुंडलिनी तेल नियमित लावणे, चौथ्या महिन्यापासून गर्भसंस्कार पुस्तकातील योगासने करण याने सुद्धा तब्येत नीट राहण्यास मदत मिळते. सध्याच्या परिस्थितीत रोज सॅनअमृत हर्बल चहा घेणे आवश्यक. यामुळे प्रतिकारशक्ती उत्तम राहील.

माझा मुलगा आठ वर्षांचा आहे. लहानपणापासून त्याला फक्त पावसाळ्यात दम्याचा त्रास होतो, रात्री अपरात्री त्रास होऊ नये, दवाखान्यात न्यायची वेळ येऊ नये यासाठी आत्तापासून काही उपचार करता येतील का?

...सौ. जयश्री पाळे

उत्तर - आत्तापासून नक्कीच उपचार करता येतील. पावसाळ्यात वातप्रकोपामुळे जो दम लागतो त्यासाठी आत्तापासून मुलाच्या अंगाला तेल लावणे, पोट साफ होण्याकडे लक्ष देणे, आठ-दहा दिवसातून एकदा एरंडेल तेल देणे चांगले. मुलाला रोज सकाळ-संध्याकाळ अर्धा अर्धा चमचा संतुलन सितोपलादी चूर्ण मधात मिसळून देण्याचा उपयोग होईल. वैद्यांच्या सल्ल्याने श्र्वासकुठार गोळी, प्राणसॅनयोग सुद्धा सुरू करता येईल. पावसाळा सुरू झाला की एक दिवसाआड छातीला तेल लावून वरुन रुईच्या पानांनी शेक करण्यानेही दम्याचा त्रास टाळता येऊ शकतो.