प्रश्नोत्तरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

question answer

माझी मुलगी ३५ वर्षांची आहे. कामानिमित्त तिला सतत मोबाईलचा वापर करावा लागतो. हेडफोन्स वापरले तरी आजकाल ती कान अधूनमधून दुखत असल्याचे सांगते.

प्रश्नोत्तरे

माझी मुलगी ३५ वर्षांची आहे. कामानिमित्त तिला सतत मोबाईलचा वापर करावा लागतो. हेडफोन्स वापरले तरी आजकाल ती कान अधूनमधून दुखत असल्याचे सांगते. हा त्रास होऊ नये व मुख्य म्हणजे भविष्यात काही मोठी समस्या उद्भवू नये यासाठी काही उपाय सुचवावा.

- योगिता सावंत

उत्तर - मोबाईल, हेडफोन्सचा सातत्याने वापर करणाऱ्यांसाठी तसेच खूप गोंगाट, मोठा आवाज असणाऱ्या ठिकाणी काम करणाऱ्यांसाठी कानात नियमितपणे तेल टाकणे आवश्यक होय. यासाठी संतुलन श्रुती सिद्ध तेल वापरता येईल. झोपण्यापूर्वी रोज रात्री थोडेसे कोमट केलेले हे तेल दोन्ही कानांमध्ये ३-४ थेंब या प्रमाणात टाकण्याने व वर कापसाचा बोळा ठेवण्याने कानांवरचा अति ताण दूर होतो व वात कमी होऊन दुखणे सुद्धा थांबते असा अनुभव आहे. या शिवाय सुट्टीच्या दिवशी किंवा वेळ काढून आयुर्वेदातील कर्णपूरण हा उपचार करून घेणेसुद्धा उत्तम.

उन्हाळा सुरू झाला की माझ्या मुलाच्या तळहाताची साल निघण्यास सुरुवात होते. उन्हाळा संपेपर्यंत त्याच्या हातापायांची जळजळ होत राहते. एकंदर त्याची प्रकृती पित्ताची असावी असे वाटते. यावर काही उपाय आहे का?

- लता देसाई

उत्तर - मुलाला सकाळ-संध्याकाळ २-२ संतुलन पित्तशांती गोळ्या देण्याचा उपयोग होईल. सकाळी चमचाभर गुलकंद देण्याने, रात्री झोपण्यापूर्वी अविपत्तीकर चूर्ण किंवा सॅनकूल चूर्ण घेण्याने दुसऱ्या दिवशी पोट साफ होऊन शरीरातील वाढलेली उष्णता निघून जाण्यास मदत मिळेल. तळपायाला तसेच तळहातांनाही पादाभ्यंग घृत लावून शुद्ध काशाच्या वाटीने घासण्याचाही उपयोग होईल. यावर्षी उन्हाळा सुरू असेपर्यंत हे उपचार सुरू ठेवावेत, पुढच्या वर्षी मात्र उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच ही काळजी घेतली तर त्रास होणार नाही किंवा त्रासाची तीव्रता निश्र्चित कमी होईल.

Web Title: Question And Answer 22nd April 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :health newsFamily Doctor
go to top